छ. संभाजीनगर: पैठणमध्ये वेगवेगळ्या घटनेत २ जणांचा मृत्यू

Paithan
Paithan

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरात रविवारी (दि.१६) वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये यश बजरंग गव्हाणे (वय १७, रा. कहारवाडा, पैठण) या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. तर दुसऱ्या घटनेत नवीन मोंढा संतनगर येथे घरामध्ये पाण्याची विद्युत मोटर सुरू करताना तुकाराम रामभाऊ साळुंखे (वय ३६) यास विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला.

शहरातील कहारवाडा पैठण परिसरात रहिवासी असलेल्या यश बजरंग गव्हाणे या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपविले. तर रविवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान नवीन मोंढा संतनगर येथील तुकाराम रामभाऊ साळुंखे हे नळाला पाणी आल्यामुळे घरातील विद्युत मोटर सुरू करीत होते. यावेळी शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पैठण शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी दिली.

पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे यांचा मार्गदर्शनाखाली पैठण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पैठण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार चेडे हे करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news