Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud | सायबर फसवणुकीतील पैसे तक्रारदारास परत; पिशोर पोलिसांची तत्पर कारवाई

तातडीने तक्रार केल्याने रक्कम होल्ड; न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळाला दिलासा
cyber fraud
cyber fraudpudhari photo
Published on
Updated on

Pishor Police Cyber Crime Action

पिशोर : सायबर फसवणुकीत गमावलेल्या रकमेपैकी १७ हजार ५०० रुपये तक्रारदारास परत मिळवून देण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून फसवणुकीची रक्कम संशयिताच्या बँक खात्यात होल्ड केली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत करण्यात आली.

उंबरखेडा, ता. कन्नड येथील सुनील चव्हाण यांची सायबर माध्यमातून १७ हजार ६१९ रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांनी २१ एप्रिल २०२६ रोजी पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधून सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदविली.

cyber fraud
Chhatrapati Sambhajinagar cyber fraud : ओटीपी शेअर न करता महिलेच्या खात्यातून उडवले १७.८२ लाख

तांत्रिक तपासात फसवणुकीतील १७ हजार ५०० रुपये एअरटेल पेमेंट्स बँकेतील संशयित खात्यात वर्ग झाल्याचे आढळले. पोलिसांच्या तत्परतेमुळे ही रक्कम पुढे हस्तांतरित होण्यापूर्वीच होल्ड करण्यात आली. न्यायालयाकडून आवश्यक आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित बँकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर १७ हजार ५०० रुपये चव्हाण यांना परत मिळाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई पवन खंबाट व संदीप चव्हाण यांनी केली.

cyber fraud
Chhatrapati Sambhajinagar cyber fraud : ३० टक्के परताव्याचे आमिष दाखवून गृहिणीची २२ लाखांची फसवणूक

‘फसवणूक होताच १९३० वर संपर्क साधा’

सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० वर संपर्क साधावा. तसेच संबंधित बँकेला माहिती देऊन सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तक्रार जितक्या लवकर केली जाईल, तितकी रक्कम होल्ड करून ती परत मिळविण्याची शक्यता वाढते, असे आवाहन सपोनि कुणाल सूर्यवंशी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news