Chhatrapati Sambhajinagar |पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबले अन्... क्षणात वीज पडून पती-पत्नीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर - दहिगाव शिवारात घडली घटना
lightning strike |
lightning strikeFile Photo
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar couple struck by lightning under tree

सिल्लोड : पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आश्रयाला थांबलेल्या पती-पत्नीचा वीज पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तालुक्यातील दहिगाव शिवारात घडली.

मनोहर भिवसन दुधे (वय ६०), पर्वताबाई मनोहर दुधे (वय ५७, रा. दहिगाव, ता. सिल्लोड) असे मृत पती- पत्नीचे नाव आहे.

गुरुवारी दुपारी तालुक्यात महिनाभराच्या खंडानंतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. दहिगाव शिवारातही पावसाने हजेरी लावल्याने शेतात गेलेल्या मृत पती-पत्नी यांनी झाडाचा आश्रय घेतला.

lightning strike |
Paithan Crime | गुप्तधनातील सोने देण्याच्या बहाण्याने सराफाला बोलावले; मारहाण करून १० लाख लुटले

या दरम्यान वीज पडली व पती- पत्नीचा मृत्यू झाला. माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली.

lightning strike |
Chhatrapati Sambhajinagar|हायवा ट्रकसह ६ ब्रास वाळू जप्त; तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news