Chhatrapati Sambhajinagar|हायवा ट्रकसह ६ ब्रास वाळू जप्त; तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar - पिशोर पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar illegal sand truck seized 50 lakhs

पिशोर : पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खनिज वाळूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरोधात पिशोर पोलिसांनी धडक कारवाई केली. सिल्लोड-चिचोली लिंबाजी रोडवरील शेलगाव फाटा येथे बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत हायवा ट्रकसह अंदाजे ६ ब्रास वाळू असा एकूण ५० लाख ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेलगाव फाट्यावर पोलिसांची नजर

पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.५० वाजता सिल्लोड–चिचोली लिंबाजी रोडवरील शेलगाव फाटा परिसरात पोलिसांनी कारवाई केली.

यावेळी वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा हायवा ट्रक पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे सहा ब्रास अवैध वाळू आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी हायवा ट्रक आणि वाळू असा संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला.

५० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत सोहेल राजू शहा (वय २६ वर्षे, रा. धनगर गल्ली, फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी हायवा ट्रक आणि अंदाजे सहा ब्रास वाळू असा एकूण ५० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित आरोपीस अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पिशोर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच गौण खनिज अधिनियमातील कलम २१(१), २१(२), २१(३), २१(४) व २१(५) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Paithan Crime | गुप्तधनातील सोने देण्याच्या बहाण्याने सराफाला बोलावले; मारहाण करून १० लाख लुटले

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शाम गवळी, पोलिस हेड कॉन्स्टेबल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, करण म्हस्के, राजपूत, घुगे यांनी ही कारवाई पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Devendra Fadnavis | मराठवाड्यात दुष्काळाचे संकट; ५ ऑक्टोबरनंतर तातडीने पंचनामे: मुख्यमंत्री फडणवीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news