

छत्रपती संभाजीनगर : वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासह इनाम जमिनींच्या प्रश्नावर राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. मदतमास, खिदमतमासच्या जमिनींसंदर्भातील कायदा डिसेंबरमध्ये विधिमंडळात आणण्यात येईल. तर वर्ग २ जमिनींच्या गैरव्यवहारांच्या चौकशी करण्यासाठी या महिनाअखेर विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करणार आहे. त्यात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त असतील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि. २) सांगितले.
महसूल विभागात शासनाने १०३ सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. असे सांगत मंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल विभागातील अधिकारांचे विकेंद्रीकरण करताना महसूल उपजिल्हाधिकारी (आरडीसी) यांच्याकडे संबंधित अधिकार दिले आहेत. वर्ग २ जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित कोटी करताना १ रुपयांपर्यंतच्या प्रकरणांत अधिकारही जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात. तर शर्तभंगमध्ये १० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकरणांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मदतमास आणि खितमतमास जमिनींच्या संदर्भात विधिमंडळात कायदा करावा लागणार आहे. या जमिनींच्या व्यवहारांमध्येआकारण्यात येणारी २५ टक्के रक्कम पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी होत आहे. त्यावर कायदेशीर तरतुदी करून निर्णय घ्यावा लागणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
एसआयटीकडे अर्ज करा
मदतमास आणि खितमतमाससह वर्ग २ च्या विविध जमिनींची अवैध विक्री झाल्याच्या तक्रारी आहेत. यात ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी एसआयटीकडे अर्ज करावेत. त्यात चौकशी करून चुकीच्या नोंदी अथवा व्यवहार दुरुस्त करणे, फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मंत्री बावनकुळे सांगितले.
एसओपीचा गैरवापर अंगल येणार
तुकडेबंदीचे आदेश शिथीत करतांना जी एसओपी निश्चित केली आहे. त्यानुसारच दस्त नोंदणी होणे आवश्यक आहे. त्याला बगल देत गैरवापर करुन चूकीचे दस्त नोंदविले गेले. तर संबंधितांवर गुन्हे दाखल करणार, असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.
पदवीधर महायुतीतच लढणार
विधानपरिषदेच्या सर्व निवडणूक महायुतीत लढण्याचा निर्णय झाला आहे. जेथे ज्या पक्षाचा सिटींग आमदार, ती जागा त्या पक्षाकडेच राहिल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे आता मराठवाडा पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हेच उमेदवार राहणार आहेत.