Sambhajinagar Cyber Fraud : सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाच्या खात्यातून ४ लाख रुपये पळवले

सायबर चोरट्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sambhajinagar Cyber Fraud
Sambhajinagar Cyber Fraudpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका बिल्डरच्या त्यांच्या आईसोबत संलग्नित असलेल्या बँक खात्यावरून सायबर चोरट्यांनी चार लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास समोर आली. फसवणूक झालेल्या बिल्डरचे नाव अमरीश सुभाष हौजवाला असून, त्यांच्या तक्रारीवरून सायबर चोरट्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमरीश हौजवाला (४४, रा. एन ३ सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे बँक खाते त्यांच्या आईच्या खात्याशी संलग्नित आहे. २५ नोव्हेंबर रोजी त्यांना बँकेतून तुम्ही तुमच्या खात्यावरून काही आर्थिक व्यवहार करीत आहात का, अशी विचारणा केली. त्यांनी कोणताही व्यवहार केला नसल्याने सांगतले.

Sambhajinagar Cyber Fraud
Sambhajinagar Marriage Fraud : बनावट लग्न लावून पाच लाखांची फसवणूक

दरम्यान तुमच्या खात्यावरून पाच वेळेस रक्कम विविध खात्यावर ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली. या संशयास्पद व्यवहारांमुळे येणाऱ्या दिवसांतही मोठी फसवणूक होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन बँक अधिकाऱ्यांनी हौजवाला यांना सायबरकडे तक्रार करण्याची सूचना दिली. या सूचनेनुसार हौजवाला यांनी सायबर क्राईमशी संपर्क साधून तत्काळ तक्रार नोंदवली.

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात अमरीश हौजवाला यांच्या तक्रारीवरून त्यांच्या बँकेच्या खात्यावरून ४ लाख ९ हजार ९८१ रुपये सात पैसे अशी ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर करणाऱ्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक काळे करीत आहेत.

Sambhajinagar Cyber Fraud
Chhatrapati Sambhajinagar Accident : गंगापूरजवळ कंटेनरची दोन कारला भीषण धडक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.