Sambhajinagar Marriage Fraud : बनावट लग्न लावून पाच लाखांची फसवणूक

बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Sambhajinagar Marriage Fraud
Sambhajinagar Marriage Fraudpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : लग्नाळू तरुणांकडून वधू मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपये घेतले. लग्न लावल्यानंतर मात्र नववधू एकाच दिवसात तरुणाला सोडून निघून गेली. बनावट लग्न लावून पाच लाख रुपये उकळल्याचे लक्षात येताच तरुणाने लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लक्ष्मण कन्नुगोळे (30, रा. बारसवाडा, ता. अंबड, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १७ एप्रिल या कालावधीत वानखेडेनगर एन-१३ येथील लग्नाच्या ठिकाणी आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा विश्‍वास संपादन केला.

Sambhajinagar Marriage Fraud
Chhatrapati Sambhajinagar Accident : गंगापूरजवळ कंटेनरची दोन कारला भीषण धडक

लग्नासाठी मुलगी दाखवून विवाह लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेत बनावट लग्न लावून त्यांची फसवणूक केली.

या प्रकरणी सुनील विठोबा खेमणार, कोमल राजू पवार, सचिन जाधव आणि कांता राहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोमटे करीत आहेत.

Sambhajinagar Marriage Fraud
Jharkhand Accident: शिक्षक झाल्याच्या आनंदात कुटुंब देवदर्शनाला निघालं; वाटेतच काळानं गाठलं, झारखंडमध्ये भीषण अपघात; १३ ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.