Chhatrapati Sambhajinagar Accident : गंगापूरजवळ कंटेनरची दोन कारला भीषण धडक

आष्टीच्या एका महिलेचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
Chhatrapati Sambhajinagar Accident
Chhatrapati Sambhajinagar Accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

गंगापूर : विवाह सोहळा आटोपून आनंदाने घराकडे परतणाऱ्या आष्टी येथील जोशी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ सिद्धार्थ जिनिंगसमोर भरधाव कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन कारना जोरदार धडक दिली. शुक्रवारी (दि. २७) रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात विद्या राजेंद्र जोशी (वय ५८, रा. आष्टी, जि. बीड) यांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही कारच्या एअरबॅग उघडूनही प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. एक कार पलटी होऊन थेट शेतात जाऊन पडली, तर दुसऱ्या कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात जोशी कुटुंबातील तिघेही गंभीर जखमी झाले.

Chhatrapati Sambhajinagar Accident
Pune Road Accidents: पुण्यात रस्ते अपघातांचा कहर! दहा महिन्यांत २६३ जणांचा मृत्यू

दुसऱ्या कारमधील योगेश पंढरीनाथ मनाळ (वय ३५), अनिल वसंत पारखे (वय ३२, दोघे रा. वाहेगाव) आणि चंद्रकांत नामदेव सुंब (वय ५१, रा. मांजरी) हेही जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

स्थानिकांकडून तातडीने मदतकार्य

अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. साजिद शेख यांनी जखमींना कारमधून बाहेर काढण्यास मदत केली. रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी सर्व जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने विद्या जोशी यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत होते; मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Chhatrapati Sambhajinagar Accident
Fake Police Sub Inspector: घाटकोपरमध्ये बनावट पोलीस उपनिरीक्षकाला अटक; गणवेशातील फोटो आणि बनावट कागदपत्रे सापडली

बीड जिल्ह्यातील जोशी कुटुंबावर काळाचा घाला

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कलाभाई जयनारायण जोशी (वय ८०), राजेंद्र जयनारायण जोशी (वय ६३) आणि विद्या जोशी हे गंगापूर येथील तिवारी परिवाराच्या विवाह सोहळ्यासाठी आले होते. सोहळा आटोपून शुक्रवारी रात्री ते बलेनो कारने (क्र. एमएच २३ एडी ४२५१) आष्टीकडे परतत होते. सिद्धार्थ जिनिंगसमोर आले असता समोरून येणाऱ्या कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. याचवेळी छत्रपती संभाजीनगरहून गंगापूरकडे जाणाऱ्या ब्रेझा कारलाही (क्र. एमएच २० ईवाय ३३७३) कंटेनरने धडक दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.