Sambhajinagar crime : 'इसको मार डालो' म्हणत महिलेने पकडले हात, अन् 'फुकट दाऊद'ने केले सपासप वार

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला : जिन्सी पोलिसांत तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा ; एकाला अटक
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. २४) मध्यरात्री २:३० ते ३ वाजेच्या दरम्यान अपेक्स हॉस्पिटलजवळ घडली. या हल्ल्यात एका महिलेने तरुणाचे हात घट्ट पकडून 'इसको मार डालो' अशी चिथावणी दिली, त्यानंतर गुंडांनी त्याच्या पाठीवर आणि मांडीवर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार अजिम शेख ऊर्फ फुकट दाऊद शेख, त्याचा मेहुणा सय्यद छोटू सय्यद बाबा आणि अजीमची पत्नी आफरीन अजीम शेख (तिघे रा. बायजीपुरा, संजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत. छोटूला पोलिसांनी अटक केली असून त्याला २७ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime : ग्रामीण पोलिसांचा अवैध धंद्यांवर 'सर्जिकल स्ट्राईक'

फिर्यादी शेख जफर शेख मजहर (४२, रा. रहेमानिया कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ शेख अजहर हा त्यांच्यासोबतच राहतो. सोमवारी (दि. २४) रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेख अजहर आणि त्याचा मित्र इर्शाद शेख हे दोघे अपेक्स हॉस्पिटलकडून पायी जात होते.

ते संजयनगरमधील (गल्ली नं. सी-१०) महादेव मंदिराजवळ आले असता, त्यांना तिथे ओळखीचे तीन आरोपी भेटले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी अजहर याला शिवीगाळ करत अचानक वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असतानाच, आरोपी अजिम शेख ऊर्फ 'फुकट दाऊद' याने चाकू काढून अजहरला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीवर डाव्या बाजूस आणि कमरेवर सपासप वार केले. त्याचवेळी दुसरा आरोपी फैसल शेख ऊर्फ छोटू यानेही चाकू काढून पाठीमागून अजहरच्या दोन्ही पायांच्या मांडीवर गंभीर वार करून त्याला रक्तबंबाळ केले.

हा थरार सुरू असतानाच, महिला आरोपी आफरीन हिने शिवीगाळ करत 'इसको मार डालो' असे म्हणत अजहरचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले होते. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजहरला तातडीने घाटीत दाखल केले. माहिती मिळताच जफरने घाटीत धाव घेतली तेव्हा भावाने घडलेला सर्व प्रसंग सांगितला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मदनसिंग घुनावत करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Tipu Sultan Photo | मालेगाव उपमहापौरांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फोटो झळकला

फुकट दाऊद सराईत गुन्हेगार

अजिम शेख ऊर्फ फुकट दाऊद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो हल्ला केल्यानंतर पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news