

Chhatrapati Sambhajinagar After love marriage, the married man was beaten up
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून एकाने संबंध प्रस्थापित केले. पुढे लग्नास टाळाटाळ केल्याने तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंद होताच त्याने तिच्याशी मंदिरात लग्न केले. मात्र घरी नांदवले नाही. तरुणीने कायदेशीर नोटीस देऊनही उत्तर न दिल्याने ती जाब विचारण्यासाठी घरी गेली असता सर्वांनी मिळून तिला हाकलून दिले.
त्यानंतर रस्त्यात गाठून मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि.२९) सायंकाळी सातच्या सुमारास भानुदासनगर भागात घडला. सुनंदा तेजराव लहाने, अमृता अकोलकर आणि कल्याण तेजराव लहाने, अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मारहाण करणारे जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या जवळचे नातेवाईक असल्याचे समजते.
२४ वर्षीय पीडिता डी फार्मसीचे शिक्षण घेते. तिची श्रीकांत तेजराव लहाने (३०, रा. भानुदासनगर) याच्यासोबत २०२३ मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर श्रीकांतने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी ९ एप्रिल २०२४ रोजी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पीडितेने गुन्हा मागे घ्यावा म्हणून श्रीकांतने पीडितेसोबत १० नोव्हेंबर २०२४ रोजी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील महादेव मंदिरात विवाह केला. मात्र त्याने पीडितेला घरी नांदविले नाही.
घरी लग्नाबद्दल सांगून तुला नांदायला नेतो, अशी थाप मारून तो निघून गेला. १५ मे गोजी पीडितेने वकील गणेश म्हस्के यांच्यामार्फत श्रीकांत लहानेला नोटीस पाठविली. मात्र श्रीकांतकडून पीडितेला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. २९ मे रोजी पीडिता श्रीकांत लहानेच्या घरी गेली. तेथे त्याची आई सुनंदा तेजराव लहाने आणि पुतण्या हे दोघे होते.
त्यांनी पीडितेला घरात घेणार नाही, असे म्हणत हाकलून दिले. त्यामुळे पीडितेने डायल ११२ वर कॉल केला. तेथे पोलिस आले. त्यांनी तिला ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले. ती रिक्षाने जवाहरनगर ठाण्याकडे जात असताना दुर्गामाता मंदिर- ाजवळ आरोपी कल्याण तेजराव लहाने, अमृता अकोलकर यांनी चारचाकीने रिक्षा आडविली. पीडितेला खाली ओढत बेदम मारहाण केली. कल्याणने पीडितेचे डोके रस्त्यावर आपटले. पोलिस आले आणि पीडितेला घेऊन ठाण्यात गेले.