

Kannad City Rain Damage
कन्नड : तालुक्यात गेल्या आठवड्या पासून अवकाळी पाऊस पडत असून आता तर अवकाळी पाऊस गेल्या तीन दिवसापासून रात्री वादळी वाऱ्यासह कोसळत असल्याने जणू काही अवकाळी पाऊस मुक्कामाला थांबला असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाने खरीप हंगामाच्या शेती कामाला ब्रेक तर लागला मात्र यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील शिवना नदीला ऐन उन्हाळ्यात पूर आला असून नदी ओसंडून वाहत आहे.
तर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कन्नड शहरातील छम्मना बंगला जवळ असलेल्या एका घराची भिंत कोसळल्याने दोन बालके दबली होती.नागरिकांनी धावपळ करून या बालकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले. या सर्व परिस्थितीवर तहसीलदार विद्याचरण कडवकर सह आपत्ती व्यवस्थापन पथक लक्ष ठेवून तैनात आहे.