

हतनूर : कन्नड तालुक्यातील टापरगांव येथे शिवना टाकळी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एका अज्ञात तरूणाचा मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
शिवना टाकळी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची कन्नड ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला. या मृत व्यक्तीचे वय ३० ते ३५ असून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.