Cattle smuggling : सिल्लोडहून गोवंशाची तेलंगणात तस्करी; गुन्हे शाखेने कंटेनरसह 'पायलटिंग' कार पकडली

पोलिसांच्या नाकाबंदीतून सुटण्यासाठी मुख्य म्होरक्या स्वतःच्या स्विफ्ट कारने कंटेनरला सीमेपर्यंत एस्कॉर्ट करत होता.
Cattle smuggling : सिल्लोडहून गोवंशाची तेलंगणात तस्करी; गुन्हे शाखेने कंटेनरसह 'पायलटिंग' कार पकडली
Published on: 
Updated on: 

Cattle smuggling from Sillod to Telangana; The crime branch caught the 'piloting' car with the container

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड येथून एका बंदिस्त कंटेनरमध्ये २९ गोवंश क्रूरपणे कोंबून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. पोलिसांच्या नाकाबंदीतून सुटण्यासाठी मुख्य म्होरक्या स्वतःच्या स्विफ्ट कारने कंटेनरला सीमेपर्यंत एस्कॉर्ट करत होता.

Cattle smuggling : सिल्लोडहून गोवंशाची तेलंगणात तस्करी; गुन्हे शाखेने कंटेनरसह 'पायलटिंग' कार पकडली
Encroachment Remove : व्हीआयपी रोडवरील अतिक्रमणे हटविण्यास आणखी दोन दिवस

मात्र, गुन्हे शाखेने जालना रोडवरील केंब्रिज चौकात सापळा रचून पायलटिंग करणाऱ्या कारसह कंटेनर जागेवरच पकडला. या कारवाईत २९ गोवंशांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, मुख्य म्होरक्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीम सुलतान शेख (२४, चालक, रा. अब्दाली शहानगर, सिल्लोड), शेख जावेद लुकमान (३६, रा. स्नेहनगर, सिल्लोड) आणि शेख समीर शेख शब्बीर (२७, रा. अब्दाली शहानगर, सिल्लोड) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. तर त्यांचा साथीदार आवेस आणि इतर दोन संशयित पसार झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, एका बंद कंटेनरमधून गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक केली जाणार आहे. त्यानुसार पथकाने शनिवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील केंब्रिज चौकात नाकाबंदी केली. संशयित स्विफ्ट कार आणि तिच्या मागे येणारा बंद बॉडीचा कंटेनर पथकाने अडवला. कंटेनर उघडून तपासणी केली असता, त्यामध्ये २९ गोवंश दाटीवाटीने व क्रूरपणे दोरीने बांधून कोंबलेले आढळले.

Cattle smuggling : सिल्लोडहून गोवंशाची तेलंगणात तस्करी; गुन्हे शाखेने कंटेनरसह 'पायलटिंग' कार पकडली
Share Trading : शेअर ट्रेडिंगच्या नावाने एचपीसीएलच्या कर्मचाऱ्याला ४८ लाखांचा गंडा

पोलिसांनी तात्काळ २९ जनावरे, कंटेनर, कार आणि आरोपींचे मोबाईल असा ३० लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षित गोशाळेत हलवण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, हवालदार अकोले, अमोल शिंदे, घोडके, अंमलदार राठोड, जाधव आणि गरड यांच्या पथकाने केली.

जप्त करण्यात आलेला हाच कंटेनर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी गोवंश तस्करीच्या गुन्ह्यात बीड पोलिसांनी पकडला होता. त्या कारवाईतून सुटताच या टोळीने पुन्हा त्याच कंटेनरचा वापर करून गोवंशाची वाहतूक सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आरोपींनी कंटेनरच्या नंबर प्लेटवरील मूळ नोंदणी क्रमांकामध्ये खाडाखोड करून बनावटीकरण केले होते.

कारवर महाराष्ट्र राज्य अन् व्हीआयपी लोगो

सिल्लोड येथून निघालेला हा गोवंशाचा कंटेनर तेलंगणा राज्यात पोहोचवण्याचा या टोळीचा डाव होता. रस्त्यात कुठे पोलिस नाकाबंदी किंवा तपासणी पथक आहे का, याचा सुगावा घेण्यासाठी मुख्य आरोपी शेख जावेद हा स्वतःच्या कारमधून कंटेनरच्या पुढे पुढे चालत होता. संशय येऊ नये आणि टोलनाके तसेच पोलिस तपासणी नाक्यांवर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी त्याने कारच्या मागे-पुढे महाराष्ट्र राज्य आणि मागील काचेवर व्हीआयपी असा लोगो लावला होता. या बनावाच्या आधारे महाराष्ट्राची सीमा ओलांडेपर्यंत कंटेनरला एस्कॉर्ट करण्याची पूर्ण तयारी त्याने केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news