

Two more days to remove encroachments on VIP Road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : व्हीआयपी रोडवरील मालमत्ताधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली असून या पार्श्वभूमिवर महापालिका प्रशासनाने या भागातील नागरिकांना आणखी दोन दिवसांचा अवधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भडकल गेट ते लेबर कॉलनीदरम्यान सोमवार (दि.२६) ची नियोजित कारवाई पुढे ढकलली आहे. पदवीधर निवडणूक मतमोजणीसाठी काही अधिकारी कर्मचारी नियुक्त असून पोलीस बंदोबस्त मिळण्यातही अडचणी असल्याने प्रशासनाकडून आजची कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.
महापालिकेने जुन्या शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात रोशन गेट ते चंपा चौक रस्त्यापासून करण्यात आली. गेल्या आठवड्यात या मार्गावरील सुमारे ४६० अतिक्रमणे हटविण्यात आली. या तिर मानिन्यासिका छत्रपती संभाजीनगर कारवाईनंतर व्हीआयपी रोडवरील भडकल गेट ते लेबर कॉलनीपर्यंतचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले.
कारवाईपूर्वी महापालिकेच्या पथकाने परिसरात भोंगा फिरवून नागरिकांना अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याचे आवाहन केले होते. रस्त्याला अडथळा ठरणारे शेड, दुकानांसमोरील ओटे आणि इतर बांधकामे काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मालमत्ताधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची मंगळवारी (दि.२७) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होण्यात अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय महापालिकेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नियोजित कारवाईसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने प्रशासनाने अतिक्रमणधारकांना आणखी दोन दिवसांची मुदत दिली आहे.