भुमरेंच्या चालकावर अखेर गुन्हा दाखल

जालना रोडवरील मौजे बागशेरजंग (दाऊदपुरा) येथील सुमारे ५०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या ९ एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
sambhajinagar news
भुमरेंच्या चालकावर अखेर गुन्हा दाखलfile photo
Published on
Updated on

Case Finally Registered Against Bhumre's Driver

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जालना रोडवरील मौजे बागशेरजंग (दाऊदपुरा) येथील सुमारे ५०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या ९ एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

sambhajinagar news
Sambhajinagar Fraud Case : निवृत्त पीएसआयलाच लावला १ कोटी ३३ लाखांचा चुना

आर्थिक गुन्हे शाखेत गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर, अखेर परभणी येथील वकील मुजाहिद खान यांच्या फिर्यादीवरून हैदराबादचे सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान आणि खा. संदीपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख व इतर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २८) रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक जावेद रसूल शेख

फिर्यादी परभणी येथील वकील मुजाहिद इकबाल खान (५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१५ मध्ये सालारजंग कुटुंबातील मीर महेमूद अली खान बशारत अली खान (७५, रा. हैदराबाद) यांनी त्यांच्या औरंगाबाद येथील ९ एकर जमिनीचा (सव्र्व्हे नं. ३, सीटीएस १४८४४/ए व बी) वाद लढण्यासाठी खान यांची मदत घेतली होती. या जमिनीचे पीआर कार्डवर नाव लागल्यानंतर ३ एकर जमीन देण्याचे आश्वासन देत मीर महेमूद यांनी खान यांच्याशी अॅग्रीमेंट टू सेल केले होते. खान यांनी स्वखचनि आणि कायदेशीर कसब वापरून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख ते महसूल मंत्र्यांपर्यंत हा लढा दिला आणि ३० जानेवारी २०२३ रोजी मीर महेमूद यांच्या बाजूने निकाल मिळवला.

sambhajinagar news
बनावट कागदपत्रांद्वारे कोहिनूर शिक्षण संस्थेच्या मालमत्तेवर ५ कोटींचे कर्ज

विश्वासघात आणि हिबानामा

फिर्यादीत म्हटले आहे की, जमिनीचा निकाल बाजूने लागल्यानंतर मीर महेमूद यांनी पैशाची अडचण असल्याचे कारण सांगून वकील मुजाहिद खान यांच्याकडून वेळोवेळी ९० लाख ते १ कोटी रुपये घेतले. त्यानंतर मीर महेमूद यांनी त्यांना जमिनीचा रजिस्टर जीपीए आणि हिबानामा (बक्षीस पत्र) देखील करून दिला होता. मात्र जमिनीचा ताबा देण्याची वेळ आली असता, मीर महेमूद यांनी खा. भुमरे यांचे वाहन चालक जावेद रसूल शेख (३८, रा. हुसेननगर) याच्याशी संगनमत केले. खान यांना अंधारात ठेवून याच जमिनीचा पुन्हा दुसरा हिबानामा जावेद शेखच्या नावाने करून देत खान यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. संबंधित वृत्त/पान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news