Meghna Bordikar : पाणीटंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा

मंत्री बोर्डीकर यांचे निर्देश, पाणी योजनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश
Meghna Bordikar
Meghna Bordikar : पाणीटंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन कराfile photo
Published on
Updated on

Carry out micro-planning to prevent water scarcity

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच गावनिहाय सूक्ष्म नियोजन करा. उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा नियमित व सुरळीत पुरवठा होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सोमवारी (दि. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.

Meghna Bordikar
Sambhajinagar News : 'त्या' हल्ल्याचा अभियंता संघटनेकडून निषेध

या वेळी अपर आयुक्त रिता मैत्रेवार, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सोमवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागीय आढावा बैठकीत मराठवाड्यातील पर्जन्यमान, उपलब्ध पाणीसाठा, संभाव्य पाणीटंचाई तसेच विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मराठवाड्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६७९.५० मिमी असून आतापर्यंत ४३०.८० मिमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण सरासरीच्या ६३.४० टक्के आहे. लातूरमध्ये सरासरीच्या केवळ ४९.८२ टक्के, धाराशिवमध्ये ५६.०३ टक्के आणि बीडमध्ये ५८.५२ टक्के पाऊस झाला आहे.

Meghna Bordikar
Saptashrungi Gad Replica : रांजणगावात साकारला सप्तशृंगी गडाचा भव्य देखावा

त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये संभाव्य टंचाईकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, विभागात सध्या चारा टंचाई नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. विभागातील ५३ लाख ५९ हजार ४६२ पशुधनासाठी दररोज सुमारे २० हजार १२५ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता असून, सध्या ४४ लाख ८१ हजार १३६ मेट्रिक टनांहून अधिक चारा उपलब्ध आहे. हा चारा साधारणतः ८९ ते २१० दिवस पुरेल. मात्र, डिसेंबरपासून चारा टंचाईची शक्यता असल्याने आतापासून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. टंचाईच्या पार्श्वभूमीवर पर्यायी जलस्रोत सज्ज ठेवणे, पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे गतीने पूर्ण करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news