

Candidates guard strong room due to discussion regarding EVMs
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले. मात्र काही उमेदवार न्यायालयात गेल्यामुळे तीन डिसेंबरची मतमोजणी न्यायालयाच्या आदेशाने पुढे ढकलण्यात आली. आता ३१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून, तब्बल १८ दिवसांचे अंतर निर्माण झाल्याने अनिश्चितता, तणाव आणि मानसिक दडपण उमेदवारांवर वाढले आहे.
देशभर ईव्हीएम फेरफार, मशीन बदल, मतदान चोरीसंबंधी सुरू असलेल्या चर्चाचा परिणाम सिल्लोडच्या उमेदवारांवरही झाला आहे. मतदान यंत्रे पोलिस, एसआरपी व अन्य सुरक्षा दलांच्या अशा थ्रिलेहर तगड्या बंदोबस्तात सीलबंद ठेवण्यात आली असली तरी उमेदवारांची चिंताग्रस्तता कमी झालेली नाही.
न्यायालय व निवडणूक आयोगाने खबरद-ारीचा उपाय म्हणून उमेदवारांना स्ट्रॉग रूम परिसरात थांबण्याची परवानगी दिली आहे. काही उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी रात्रीच्या वेळी ठाण मांडून देखरेख करत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलेश अपार व सहनिर्णय अधिकारी कारभारी दिवेकर यांनी दिली.
दरम्यान, स्ट्रॉग रूम परिसरात बसविण्यात आलेले स्ट्रॉग सेन्सिटिव्ह सीसीटीव्ही कॅमेरे, २४ तास सशस्त्र सुरक्षा, अधिकाऱ्यांच्या आदलून सि बदलून ड्यूट्या, तसेच सीलबंद ईव्हीएमची रोजची तपासणी या सर्वांवर उमेदवारसह त्यांचे समर्थक स्वतः बारकाईने नजर ठेवत आहेत, दरम्यान, पुढील काही दिवस उमेदवार व त्यांच्या समर्थक प्रतिनिधींसाठी हा पहारा कायम राहणार आहे.
सिल्लोड शहरात राजकीय स्पर्धेला धार
सिल्लोड शहरात मुख्य कार्यालय परिसरासह महत्त्वाच्या चौकाचौकांतही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक हालचाल कैद होत आहे. सिल्लोडमध्ये उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते स्वतः पहारा देत सजग भूमिका घेताना दिसत आहेत. दरम्यान, नगरपरिषद रिंगणात महायुतीतील भाजप व शिंदे गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने राजकीय स्पर्धेला अधिक धार आली आहे. सत्तेत असूनही दोन्ही पक्ष परस्पर विरोधात उतरल्याने शहरात मैत्रीपूर्ण शत्रुत्वाची चर्चा चांगलीच रंगली आहे.