Bribe Case : मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच

बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक, सफाई कामगार एसीबीच्या जाळ्यात
News |
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया women's leadership in family planningFile Photo
Published on
Updated on

Bribe for Free Family Planning Surgery

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैशांची मागणी करणाऱ्या बिडकीन (ता. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाला (वर्ग-१) आणि एका कंत्राटी सफाई कामगाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (दि.६) रंगेहात पकडले. १२०० रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

News |
Crime News : शस्त्राचा धाक दाखवून लुटणारे चोरटे जेरबंद

डॉ. विजय बजरंग दळवी (वय ५८, रा. विनस अपार्टमेंट, बीड बायपास) आणि कंत्राटी सफाई कर्मचारी नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे (वय ३७, रा. नवीन गावठाण, बिडकीन) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

एका ३७ वर्षीय तक्रारदाराने आपल्या बहिणीची शासकीय योजनेतून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी यांच्याशी ५ एप्रिल रोजी संपर्क साधला होता. शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाते. असे असतानाही डॉ. दळवी यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

News |
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

मोफत मिळणाऱ्या सेवेसाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तात्काळ एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने तात्कळ पडताळणी करून कारवाई केली. ही कारवाई एसीबीच्या पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, संतोष तीगोटे, हवालदार इंगळे आणि युवराज हिवाळे यांच्या पथकाने केली. आर-ोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news