Crime News : बीड बायपासवर पुन्हा रात्रीस खेळ चाले

बोगस तृतीयपंथींच्या टोळ्या सक्रिय
Sambhajinagar Crime News
Crime News : बीड बायपासवर पुन्हा रात्रीस खेळ चालेpudhari photo
Published on
Updated on

Bogus transgender gangs active

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बीड बायपास रस्त्यावरील गांधेली फाट्यापासून काही अंतरावर रात्रीच्या अंधारात बोगस तृतीयपंथींचा पुन्हा मेळा भरत असल्याचे समोर आले आहे. आलिशान गाड्यांमधून येणाऱ्या आंबटशौकिनांना जाळ्यात ओढून त्यांची लूटमार करणे, त्यांना ब्लॅकमेल करणे आणि प्रसंगी जीवघेणे हल्ले करणे, असे धक्कादायक प्रकार या भागात यापूर्वी घडलेले आहे. तीन महिन्यांपूर्वीच बोगस तृतीयपंथी आणि त्याच्या दोन साथीदारांनी लुटमारीसाठी एका वकिलाचा खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी काही दिवस गस्त घातली. मात्र, त्यानंतर पुन्हा टोळ्या सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime : जन्मदाताच झाला वैरी; पाच वर्षाच्या गतिमंद चिमुकल्याची हत्या

अधिक माहितीनुसार, रात्रीच्या वेळी या ठिकाणी शहर आणि परिसरातील अनेक आंबटशौकिन वाहने घेऊन येतात. त्यांना सेवा देण्याच्या बहाण्याने या बोगस तृतीयपंर्थीच्या टोळ्या जाळ्यात ओढतात. ग्राहक बनून आलेल्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळतात. बदनामीच्या भीतीने कुणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. रस्त्यापासून आत ५० मीटरवर या टोळ्यांनी झाडाझुडपे साफ करून ग्राहकांसाठी खास व्यवस्था केली आहे.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

या रस्त्याची हद्द शहर (एमआयडीसी सिडको) आणि ग्रामीण (चिकलठाणा) पोलिसांच्या कक्षेत विभागलेली आहे. या भागात रात्रभर संशयास्पद हालचाली घडतात. दोन्ही बाजूंच्या पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही. काही दिवस पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांनी पथके पाठवून कारवाया केल्या. मात्र, या बोगस तृतीयपंथींनी बीड बायपासवर पुन्हा पक्का डेरा टाकल्याचे दिसून येत आहे.

Sambhajinagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar Murder News : प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलेल्या मित्राची केली निर्घुण हत्या

मृतदेहाची ओळख पटली, मृत्यूचे कारण अस्पष्ट

बुधवारी (दि. १५) सायंकाळी एका तरुणाचा कुजलेला मृतदेह गांधेली फाट्यापासून काही अंतरावर झाडाझुडपात आढळून आला होता. त्याची ओळख पटली असून गोरख अर्जुन राऊत (३५, रा. गेवराई, बीड, ह.मु. खडीरोड) असे मृताचे नाव आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा येथील अहवाल आल्यानंतरच कारण समजू शकेल असे एमआयडीसी सिडको पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक लखनसिंग पचलोरे करत आहेत.

केंब्रिज चौकाजवळ आढळला मृतदेह

केंब्रिज चौकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वेपटरीजवळ झाडाझुडपात एका वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी (दि. १६) आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक भरत पाचोळे यांच्या पथकाने धाव घेतली. मृतदेह घाटीत रवाना केला. मृतांची ओळख पेटवण्याचे काम सुरू आहे. रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news