Power Outage : सातारा-देवळाईकरांची रात्र अंधारात; प्रशासनाचे दुर्लक्ष

उपकेंद्रात बिघाड, तब्बल साडेआठ तासांनंतर वीज पुरवठा सुरू
Power Outage
Power Outage : सातारा-देवळाईकरांची रात्र अंधारात; प्रशासनाचे दुर्लक्षfile photo
Published on
Updated on

Power Outage : Satara-Devlaikar's night in darkness; Neglect of administration

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानंतर मध्यरात्री १२.३० वाजता देवळाईच्या वीज उपकेंद्रात अचानक बिघाड झाल्याने देवळाईसह सातारा परिसरातील निम्म्या भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सातारा-देवळाईकरांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. तब्बल साडेआठ तासांनंतर बुधवारी (दि.२२) सकाळी ९ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला.

Power Outage
Edible Oil : सुट्या खाद्यतेलामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात

शहरात दोन दिवसांपासून रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच अचानकपणे वीज पुरवठा खंडित झाला. मध्यरात्री वीज गुल झाल्याने नागरिक हैराण झाले. महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरला फोन करूनही कुणी प्रतिसाद दिला नाही. तर रात्री पाऊस कोसळत असल्याने कोणालाही घराबाहेरही पडता आले नाही.

वीज पुरवठा नेमका कोणत्या कारणामुळे बंद पडला याची माहिती न मिळाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला. घरातील पंखे बंद झाल्याने डासांच्या त्रासाने लहान मुले झोपेतून उठली, तर ज्येष्ठ नागरिकांना झोप येत नव्हती. संपूर्ण रात्र घरातील मंडळीना जागून काढावी लागली. वीज गुल झाल्याने रस्त्यावर सर्वत्र अंधार पसरला होता. मोकाट कुत्र्यांसारखा भुंकण्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

Power Outage
FDA Raid : इमरतीसाठी प्रसिद्ध गुलमंडीवरील मिठाई भांडारवर एफडीएचा छापा

पहाटे अंधारात अनेकांना मार्निंग वॉकलाही जाता आले नाही. या भागातील नागरिकांनी सकाळी फ्यूज कॉल सेंटरला फोन करून विचारणा केली असता देवळाईतील उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती देण्यात आली. सकाळी ९ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. देवळाईचा संपूर्ण परिसर आणि निम्मा सातारा परिसर रात्रभर अंधारात होता. चाटे स्कूलमागील संपूर्ण सातारा परिसराची वीज गुल झाली होती.

वीज गेल्याने नागरिकांना भेडसावलेल्या अडचणी

तब्बल साडेआठ तास वीज पुरवठा खंडित

डासांच्या त्रासामुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची झोप उडाली

पंखे, इन्व्हर्टर बंद पडल्याने उकाड्याचा सामना

रस्त्यांवरील दिवे बंद असल्याने परिसरात अंधार

मोकाट कुत्र्यांच्या वावरामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्यांची गैरसोय

फ्यूज कॉल सेंटरला वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद नसल्याची नागरिकांची तक्रार

देवळाई उपकेंद्रातील बिघाड दूर केल्यानंतर सकाळी ९ वाजता वीज पुरवठा पूर्ववत झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news