Sambhajinagar News : गांधी भवनसमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने

काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर, भाजपचे राहुल गांधींच्या निषेधार्थ आंदोलन
Sambhajinagar News : गांधी भवनसमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने
Published on
Updated on

BJP-Congress workers face to face in front of Gandhi Bhavan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी (दि.२१) प्रधानमंत्री कार्यालयासमोर धरण आंदोलन केले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी शहर भाजपच्या वतीने शहागंज येथील काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शने केली. तर त्यास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही चोख प्रतिउत्तर देत घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Sambhajinagar News : गांधी भवनसमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने
धाराशिव-बीड-संभाजीनगर नवीन रेल्वेमार्गास हिरवा कंदील

दिल्लीत सोमवारी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. तर या आंदोलनाचा निषेध करीत बुधवारी (दि.२२) भाजपच्या शहर कार्यकारिणीने शहरातील काँग्रेसच्या गांधी भवन येथील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. त्यासोबतच केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीला पाठिंबा देत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी माजी आ. संजय केणेकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देश का नेता कैसा हो-नरेंद्र मोदी जैसा हो, अशा घोषणा भाजपच्या वतीने देत परिसर दणाणून टाकला होता.

Sambhajinagar News : गांधी भवनसमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने
Crime News : औरंगपुऱ्यात दुचाकीचा धक्का लागल्यावरून तणाव

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीत जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी २६ दिवसांपासून पेपरफुटीविरोधात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सोमवारी विद्याथ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या मार्चवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. याघटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२२) कॉग्रेसनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानासमोर धरणे दिली, परंतु त्यांना बळाचा वापर करून अटक केली. यासर्वच घटनांच्या निषेधार्थ बुधवारी शहर कॉग्रेसच्या वतीने क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अक्रम, यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. सय्यद एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, राजेश मुंढे, अशोक डोळस, इकबालसिंग गिल, डॉ. नीलेश आंबेवाडीकर, इंजि. विशाल बन्सवाल, अभिषेक शिंदे, साहेबराव बनकर, मोहम्मद जाकेर, सागर नागरे, रामभाऊ लोखंडे, अस्मत खान, अनिता भंडारी, उषाताई खंडाळे, अरुणा लांडगे, शीला मगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्त्वात क्रांती चौकात झालेल्या या निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलनात नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील अनागोंधी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सक्त्तीने बळाचा वापर करून केलेली अटक या सर्वांचा निषेध करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी अॅड. सय्यद अक्रम म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित नीट परीक्षेत पेपरफुटी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर करण्यात आलेला लाठीहल्ला हा लोकशाही मूल्यांवर आघात असून, अशा दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो, असेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित. दरम्यान, या आंदोलनानंतर भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या वतीने कॉंग्रेसच्या गांधी भवन येथील कार्यालयासमोर आंदोलन केले. यास सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले. तसेच देश का नेता कैसा हो-राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news