

बिडकीन : बिडकीन येथील औद्योगिक प्रकल्पासाठी जमीन संपादित झालेल्या प्रकल्पग््रास्त शेतकऱ्यांनी गेल्या आठ वर्षांपासून दिलेल्या सातत्यपूर्ण व संघटित लढ्याला अखेर यश आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यांवर शुक्रवारी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने प्रकल्पग््रास्त शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिन ठरला आहे.
प्रकल्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत सरपंच अशोक भानुदास धर्मे, उपसरपंच किरण गुजर, ॲड. संचित पातूनकर तसेच ग््राामपंचायत सदस्य सागर फरताळे उपस्थित होते. ही बैठक सर्व प्रकल्पग््रास्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी ठरली.
प्रकल्पासाठी जमीन संपादन झाल्यानंतर योग्य मोबदला, सवलती व रोजगाराच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. दोन जानेवारी रोजी टाळेबंदी व गाव बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक, प्रशासन व प्रकल्प अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सविस्तर ऐकून घेऊन समावेशक व सकारात्मक निर्णय देण्यात आला.
मान्य झालेल्या प्रमुख मागण्या
पंधरा टक्के भूखंड देताना झाडे व विहिरीपोटी आकारलेली अतिरिक्त रक्कम माफ,पंधरा टक्के भूखंड देताना रस्त्यांसाठी घेतलेले अतिरिक्त पैसे माफ,सातशे पन्नास दिवसांची कृषी मजुरी मंजूर, लवकरच रक्कम अदा,राज्यात प्रथमच बिडकीनच्या शेतकऱ्यांना कृषी मंजुरीचा लाभ, प्रत्येक शेतकऱ्याला भूसंपादन प्रमाणपत्र देण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता,वाहन उद्योग, पोलाद उद्योग व दुचाकी उद्योगातील कंपन्यांचा रोजगार मेळावा बिडकीनमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य ग््राामपंचायतीला करामधील पन्नास टक्के वाटा मंजूरवर्ग दोनमधील पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना रक्कम मिळाली; उर्वरित पैसे लवकरच मिळणार आदी मागग्या बैठकीत मान्य करण्यात आल्या.