

Beware! Sugar is taking a toll on the youth in their twenties
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. बैठे काम आणि व्यायामाचा अभाव यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्या आहे. त्यात घरोघरी वाहने आल्याने चार पाऊले चालणेही अनेकांना जीवावर येते. त्यामुळे आता पंचविशीतील तरुणांमध्येही शर्करेचे प्रमाण वाढत असल्याचे शहरातील मधुमेह तज्ज्ञांनी सांगितले. वेळेत निदान आणि योग्य उपचार घेणे हाच या आजारावर प्रभावी उपाय असल्याचेही नमूद केले.
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा मधुमेहावर लवकर कृती ही थीम असून, या अनुषंगाने नागरिकांमध्ये आरोग्याविषयीची जनजागृती वेगाने वाढविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. आज बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे मधुमेह तरुणांमध्येही वेगाने पाय पसरत आहे. आधी वयाच्या पन्नासीनंतर मधुमेहाचा धोका जास्त असतो. मात्र, आता तरुणांमध्येही मधुमेह आढळून येत आहे.
यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. टाईप १ व मोनोजेनिक डायबीटीज हा अनुक्रमे लहान मुलांमध्ये व तरुणांमध्ये आढळून येतात. ग्रामीण भागातील महिलांमध्ये डायबेटीजचे प्रमाण वाढत असून, मधुमेह होऊच नये म्हणून, योग्य जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे, योग्य आहार घ्यावा, नियमित चालणे, व्यायाम करावा. असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला.
साखरेचा अन्य अवयवांना धोका मधुमेहावर दीर्घ काळ उपचार घ्यावे लागते. अन्यथा साखरेचे प्रमाण वाढून शरीरातील इतर अवयवांवर देखील गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो. डोळे, किडनीविकार, पाय निकामी धोका असतो असेही तज्ज्ञ म्हणाले. जागतिक होणे, हृदयविकार, अर्धांगवायूचा धोका.