

Thousands of liters of water are wasted every day due to leaky tankers
रमाकांत बन्सोड
गंगापूर : तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पोहोचविणाऱ्या टँकरमधूनच मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक टँकरमधून गळती होत असल्याने गावापर्यंत पोहोचेपर्यंत पाण्याचे मोठे प्रमाण रस्त्यावरच वाहून जात आहे इंधन व दुधाच्या टँकरला गळती लागत नाही, मग पाण्याचेच टँकर गळके का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
चालू वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या गावांना वाड्यांना शासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, यापैकी अनेक टँकरची अवस्था समाधानकारक नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
टाकीला असलेल्या गळतीमुळे मंजूर क्षमतेइतके पाणी गावात पोहोचत नसल्याने नागरिकांना प्रत्यक्षात कमी पाण्यावर समाधान मानावे लागत आहे. गळतीमुळे वाढल्या टँकरच्या खेपाटँकरला गावापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था असल्याने गळतीचे प्रमाण आणखी वाढत असल्याचे सांगितले जाते. परिणामी टँकरमध्ये भरलेले पाणी पूर्ण क्षमतेने गावात पोहोचत नाही.
पाणी कमी पडल्याने अतिरिक्त खेपा घ्याव्या लागतात आणि त्याचा थेट परिणाम शासनाच्या खर्चावर होत आहे. गळतीमुळे दररोज नेमके किती पाणी वाया जाते, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याने या नासाडीचा नेमका आर्थिक फटका किती बसतो, याचाही ताळमेळ लागत नाही. गळती असलेल्या टँकरची वेळेत दुरुस्ती करून त्यांचा वापर केल्यास वाढीव खेपा कमी होऊन शासनाचा मोठा खर्च वाचू शकतो, अशी नागरिकांची भूमिका आहे.
गंगापूर. दुष्काळग्रस्तांच्या हक्काचे पाणी रस्त्यातच वाहून जात असेल, तर ही केवळ नासाडी नसून प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह आहे टँकरची नियमित तपासणी करून गळती असलेले टँकर तातडीने सेवेतून बाजूला करावेत आणि मंजू क्षमतेइतकेच पाणी प्रत्यक्ष गावकऱ्यांना मिळते क नाही, याची प्रशासनाने कठोर तपासणी करावी