

The administration of 212 colleges is on the shoulders of the in-charge
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ४८७महाविद्यालयांपैकी ४१५ महाविद्यालयांचा नुकताच रिपोर्ट आला असून, यापैकी १५९ महाविद्यालयांत नियमित प्राचार्य आहेत. यापैकी २१२ महाविद्यालयांचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर आहे. तर ४४ महाविद्यालयांतील प्राचार्य हे सेवानिवृत्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठ प्रशासन शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. दरम्यान एकीकडे संलग्नित महाविद्यालयात अनेक अडचणी आहेत. विद्यापीठाशी मराठवाड्यातील सुमारे ४८७ महाविद्यालये संलग्नित आहेत. यापैकी सुमारे ४१५ महाविद्यालयांनी तेथील प्राचार्यांच्या स्थितीची माहिती दिली आहे. यात २१२ महाविद्यालयांचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर असल्याचे दिसून येत आहे. तर केवळ १५९ महाविद्यालयांतच नियमित प्राचार्य असल्याची माहिती समोर आली आहे.