

Bengaluru, Mumbai 15 and Hyderabad flights cancelled till December 31
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली इंडिगोची विमानसेवा आद्यापही रुळावर आली नसून, उलट मंगळवारपासून (दि.९) बेंगळुरू-छत्रपती संभाजीनगर विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली, तर मुंबई छत्रपती संभाजीनगर १५ डिसेंबरपर्यंत सायंकाळची सेवा रद्द करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद ही विमानसेवा १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गत तीन दिवस सलग सेवा बंद असल्याने सुमारे १५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
क्रुच्या कमतरतेमुळे देशभरात इंडिगोची विमानसेवा गत पाच दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. ती अद्यापही सुरळीत झाली नसून, उलट छत्रपती संभाजीनगरला येणारे बेंगळुरू विमान आजपासून १५ डिसेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसचे हैदराबाद व मुंबई विमानसेवा १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्याची घोषणा सोमवारी (दि.८) केली.
दरम्यान मागील दिवशी सलग तीन दिवस मुंबई व हैदराबाद सेवा बंद असल्याने सुमारे १५ कोटींच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. प्रवाशांनाही ऐनवेळी रद्द विमानांची माहिती मिळत असल्याने मागील तीन दिवस त्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
अशी सेवा बंद राहणार
९ ते १५ डिसेंबरपर्यंत बेंगळुरू - छत्रपती संभाजीनगर- बेंगळुरू रद्द १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत छत्रपती संभाजीनगर- हैदराबाद संभाजीनगर (दुपारी प्रस्थान १२५५ तास) रद्द ९ ते १५ डिसेंबरपर्यंत मुंबई ते छत्रपती संभाजीनगर मुंबई (संध्याकाळची फ्लाइट) रद्द करण्यात आली आहे.
इतर सर्व फ्लाइट्स वेळापत्रकानुसार उड्डाण करणार आहेत. दरम्यान मागील तीन दिवस इंडिगोची सर्वच मार्गारवरील विमानसेवा बंद असल्याने केवळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर होणारी सुमारे १५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. सेवा रद्द करण्याचा कालावधी आणखीन वाढल्याने आर्थिक फटक्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.