

Bengaluru flight services to resume regularly from tomorrow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तांत्रिक कारणामुळे बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर, मुंबई छत्रपती संभाजीनगर (सायंकाळची) रद्द झालेली विमानसेवा मंगळवार (दि.१६) पासून नियमित होणार आहे. दरम्यान त्यापूर्वीच मुबंईते छत्रपतीसंभाजीनगर सायंकाळची विमानसेवा रविवार (दि. १४) पासून सुरू करण्यात आली आहे, तर हैदराबाद विमानसेवा मंगळवार दि.१६ पासून ३१ डिसेंबरपर्यंत रद्द राहणार आहे.
क्रुच्या कमतरतेमुळे देशभरात इंडिगोची विमानसेवा गेल्या आठवड्यापासून विस्कळीत झाली आहे. या दरम्यान छत्रपती संभाजीनगरला येणारे बेंगळुरू आणि सायंकाळी मुंबईहून शहरात येणारे विमान ९ ते १५ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आले होते. परंतु मुबंई सेवा रविवारीच सुरू करण्यात आली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्यापासून हैदराबाद विमान रद्द
कर्मचाऱ्यांच्या कमरतेमुळे विविध मार्गांवरील इंडिगोची विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. यानुसारच छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद ही विमानसेवा मंगळवारपासून म्हणजे १६ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
यादरम्यान प्रवाशांना होणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असून, त्यात त्यांना यश मिळाले आहे. बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने प्रवाशांची वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी विमानतळ प्रशासन सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.