

Ban on the sale of fodder outside the district
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून आगामी काळात जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारा, जिल्ह्यातच राहावा. परजिल्ह्यात, परराज्यात विक्रीसाठी नेला जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी चारा वाहतूक बंदी आदेश जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी गौडा यांनी दुष्काळ निवारण्याच्या दृष्टीने कठोर पावले उलचण्यास सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची देखील टंचाई सुरू होणार आहे. त्यामुळे या सर्वांचे नियोजन आतापासूनच सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासनाने अगोदर धरणासह तलावातील जलस्त्रोतांचा साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासोबतच आता चारा विक्रीवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
व जिल्ह्यातून परजिल्हा परराज्यात मोठ्या प्रमाणात चारा व्यावसायिक कारणांसाठी वाहतूक होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे स्थानिक पशुधनासाठी चारा टंचाई निर्माण होऊ नये, त्यासोबतच उत्पादनावर व त्यांच्या आरोग्यावर चारा टंचाईमुळे परिणाम होऊ नये, यासाठी परजिल्ह्यात आणि परराज्यात चारा वाहतूक करण्यास आणि विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गौडा यांनी घेतला आहे. त्याबाबतचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत.
जिल्ह्याच्या हद्दीतून इतर
जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर हिरवा चारा, कडबा, कुठी, पेंड, टीएमआर आदी कोणत्याही प्रकारच्या सुका अथवा ओल्या चाऱ्याची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जनावरांचे संगोपन आणि त्यांना पुरेसा चारा उपलब्ध करून देणे प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. असेही प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
अंमलबजावणी सुरू
हा आदेश ७ ऑक्टोबर रोजी सूर्यास्तापासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ५८ अन्वये कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार