Sambhajinagar News : जिल्हा परिषदेत निधी असूनही कामे ठप्प !

अधिकारी-कंत्राटदारांच्या दिरंगाई : पाच अभियंत्यांना नोटिसा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्हा परिषदेत निधी असूनही कामे ठप्प !file photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar News: Despite funds in the Zilla Parishad, the work is stopped

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विकासकामांसाठी निधी उपलब्ध असतानाही जलजीवन मिशन, जलयुक्त शिवारसह विविध कामे रखडल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी गुरुवारी (दि. ८) अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कामांना गती देण्याऐवजी कागदोपत्री प्रगती दाखविण्याचा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. जलजीवन मिशनच्या कामांत अपेक्षित प्रगती न करणाऱ्या पाच शाखा अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Sambhajinagar News
Crime News : सासूच्या अंगावर दुचाकी घालून ठार मारण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषदेत जलव्यवस्थापन व विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनच्या सुधारित अंदाजपत्रकांना मंजुरी मिळण्यास होणारा विलंब, अपूर्ण कामे, कंत्राटदारांची दिरंगाई, जलयुक्त शिवारची रखडलेली कामे आणि निधी खर्चाची स्थिती यावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत फुलंब्री तालुक्यातील सुमारे ३९ कामांच्या सुधारित अंदाजपत्रकांची प्रक्रिया रखडल्याने सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. बैठकीला उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, सभापती बालाजी सोनटक्के, अनिता मोठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे आदी उपस्थित होते.

...तर कारवाई करणार - सभापती गरड

बांधकाम सभापती सचिन गरड म्हणाले, एकीकडे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रत्येक जण निधी उपलब्ध करण्यासाठी धडपड करतो, तर दुसरीकडे आपल्याकडे निधी उपलब्ध होऊनही शासकीय अधिकाऱ्यांच्या भोंगळ आणि सुस्त कारभारामुळे तो परत जाण्याची वेळ येते आहे. त्यामुळे सध्या समोर उभी ठाकलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कामाच्या पद्धतीत तत्काळ बदल केला पाहिजे.

ड्युटी टाईम संपला असा विचार न करता, वेळेचे बंधन बाजूला ठेवून उपाययोजनांची कामे युद्धपातळीवर मार्गी लावावीत. फायली प्रलंबित ठेवणे आता अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यानिष्काळजीपणामुळे संबंधितांना नोटिसा बजावून कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. जर कर्मचाऱ्यांकडून जनतेला वेळेत दिलासा मिळणार नसेल, तर त्यांनी थेट घरी बसायची तयारी ठेवावी; यापुढे कामचुकारांवर कठोर कारवाई अटळ आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मध्यरात्री ९ गाड्यांचा ताफा; रस्त्यावर वाढदिवसाचा धिंगाणा

कामे करा, अन्यथा कारवाई -

अध्यक्ष अविनाश गलांडे म्हणाले, एकाच कंत्राटदाराकडून अनेक कामे रखडल्यास त्याला नोटीस देऊनही काम सुरू न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलयुक्त शिवारच्या कामांतील दिरंगाईबाबतही अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. पुढील बैठकीत ठोस प्रगती सादर करण्याचे निर्देश देताना सुधारणा न झाल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करून सेवा पुस्तकात नोंद करण्याचा इशारा गलांडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news