BAMU budget 2026-27 : पायाभूत सुविधांवर भर; अधिसभा बैठकीत 20 प्रस्तावांवर चर्चा

विद्यापीठाचा 359 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
BAMU budget 2026-27
प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी कुलगुरू डॉ.विजय फुलारींसह प्रकुलगुरू,कुलसचिव उपस्थित होते.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सन 2026-27 या आर्थिक वर्षांचा 359 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभा बैठकीत शनिवारी(दि.21) मंजूर करण्यात आला. या वर्षात विद्यापीठाची अपेक्षित जमा 333 कोटी रुपये असून 25 कोटींची तूट दर्शविण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक महात्मा फुले सभागृहात सकाळी 11 वाजता पार पडली. यावेळी प्रकुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावड परीक्षा मंडळ संचालक डॉ.बी.एन.डोळे यांच्यासह सर्व अधिष्ठाता सदस्य उपस्थित होते. बैठकीत एकूण 20 विषयांवर चर्चा करण्यात आली.

BAMU budget 2026-27
Illegal opium cultivation : शेतात फुलवली अफूची शेती

हा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांनी मांडला. वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे, कक्षाधिकारी नितीन पाटील, रवी देशमुख व सहकार्‌‍यांनी अर्थसंकल्पासाठी मदत केली.

नवीन इमारतीसाठी 27 कोटींची तरतूद

अर्थसंकल्पात 27 कोटी 85 लाख रुपयांची तरतूद इमारत बांधकामे व पायाभूत सुविधांसाठी करण्यात आली आहे. यामध्ये उर्दू, पाली आणि बुध्दिझम विभाग इमारत, मानव्यशास्त्र विद्याशाखा,व्यवस्थापन शास्त्र विभाग,नाट्यशास्त्र ,क्रीडा सिंथेटिक ट्रॅक, जीम हॉल व इतर बांधकामांचा समावेश आहे. यात क्रीडा विभागांसाठी सुमारे साडे पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

BAMU budget 2026-27
Bori Parbhani tension | बोरीत पोलिसांविरोधात नागरिकांचा एल्गार, कडकडीत बंद ; ठाण्यात मांडला ठिय्या

अर्थसंकल्पाची वैशिष्टे

  • विद्यापीठाची अपेक्षित जमा 333 कोटी 31 लाख रुपये आहे. यामध्ये वेतन, अनुदान प्राप्ती, विकास व स्वतंत्र प्रकल्प योजना, इतर अनुदाने आणि विविध स्रोतांतून प्राप्त होणाऱ्या रकमेचा समावेश आहे.

  • सन 2026-27 या वर्षात विद्यापीठाचा अपेक्षित खर्च 359 कोटी 1 लाख रुपये आहे.

  • मागील वर्षी 6.46 कोटी अपेक्षित तूट होती. यावर्षी 7.15 कोटी अपेक्षित तूट दर्शविण्यात आली आहे.

  • वेतन व अनुदान खर्च 95 कोटी 5 लाख रुपये अपेक्षित आहे. तसेच विद्यापीठ निधीतून भरलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा विभाग, ज्ञान स्रोत केंद्र, विद्यार्थी विकास मंडळ, धाराशिव विद्यापीठ उपपरिसर, युनिव्हर्सिटी नेटवर्किंग अँड इन्फॉर्मेशन सेंटर आदींच्या खर्चाचा यात समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news