Illegal opium cultivation : शेतात फुलवली अफूची शेती

करंजगाव शिवारात कारवाई : 27 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
Illegal opium cultivation
करंजगाव शिवारात गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत शेतात लावलेली गाजांची झाड केली.pudhari photo
Published on
Updated on

वैजापूर : शेतीमध्ये बेकायदा अफूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (छत्रपती संभाजीनगर ग््राामीण) च्या पथकाने शनिवारी करंजगाव शिवारातील गट क्रमांक 132 मधील शेतात छापा टाकून ही कारवाई केली. कचरू बाबूराव धुरट (वय 65, रा. करंजगाव) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीत 180 किलो अफूची झाडे हस्तगत करण्यात आली असून त्यांची किंमत 27 लाख 9 हजार 225 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वैजापूर भागात गुन्हे शाखेचे पथक असताना गट क्रमांक 132 मधील बाबूराव धुरट रा. करंजगाव शिवार यांनी त्यांचे शेतामध्ये बेकायदा, विनापरवाना अफूचे पिकाची लागवड करून तिची जोपासना करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ही कार्यवाही केली. याप्रकरणी कचरू धुरट याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याखाली वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal opium cultivation
Power outage Siddhanath Wadgaon : सिध्दनाथ वाडगाव सब स्टेशनचा वीजपुरवठा कोलमडला

पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, एपीआय पवन इंगळे, संतोष मिसळे, कासम शेख, प्रमोद पाटील, सुनील गोरे, विष्णू गायकवाड, सचिन सोनार, रवी लोखंडे, अंगद तिडके, अशोक वाघ, राहुल गायकवाड, सचिन राठोड, अनिल काळे, सनी खरात, कविता पवार, विठ्ठल डोके, गोपाळ पाटील, शिवाजी मगर यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

Illegal opium cultivation
Parbhani News | छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरण : बोरीतील वातावरण तापले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news