Bori Parbhani tension | बोरीत पोलिसांविरोधात नागरिकांचा एल्गार, कडकडीत बंद ; ठाण्यात मांडला ठिय्या

शिवभक्तांवर दाखल एफआयआर रद्दसह संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी; 46 जणांवर गुन्ह्याचे प्रकरण तापले
Bori Parbhani tension
बोरी ः पोलिसांच्या निषेधार्थ बाजरपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. दुसऱ्या छायाचित्रात पोलिस ठाण्यात ठिय्या मांडलेले महिला व पुरुष.pudhari photo
Published on
Updated on

बोरी : शिवजयंती निमित्त उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर बोरीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या दडपशाही कारवाईच्या विरोधात नागरिकांसह महिलांनी शनिवारी (दि.21) भव्य मोर्चा काढत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी बोरीतील बाजारपेठही कडकडीत बंद ठेवण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनासह युवकांवर दाखल खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली.

दि.19 फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी नागरिकांनी नियोजित ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा विराजमान केला. यानंतर दि.20 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी हस्तक्षेप करत 46 जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या कारवाईमुळे बोरीसह परिसरातील गावांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Bori Parbhani tension
Shaktipeeth highway protest : ग्रामस्थ भयभीत, लढ्याचा निर्धार कायम

शनिवारी सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून महिला, पुरुष, व्यापारी व युवक मोठ्या संख्येने एकत्र आले. शिवभक्तांवरील गुन्हे रद्द करा, अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा घोषणाबाजी करत मोर्चा मुख्य मार्गाने पोलीस ठाण्यावर धडकला. ठाण्यात ठिय्या आंदोलन करत उपस्थितांनी हरिपाठ म्हणून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांच्या वतीने महिलांच्या हस्ते पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी बीट जमादार दिलावर खान पठाण यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. तसेच 46 जणांविरुध्द दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली. मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारी पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त होता. जिंतूरचे निरीक्षक गजेंद्र सरोदे व बोरीचे सपोनि रामेश्वर धोंडगे यांनी निवेदन स्वीकारले. प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

मयत व्यक्तींचीही नावे दाखल गुन्ह्यात

पोलिसांकडून दाखल गुन्ह्यातील 46 पैकी एकाचे निधन झालेले असताना त्याचे नाव गुन्ह्यात समाविष्ट केल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकारामुळे संताप अधिक वाढल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तसेच बोरी शहरात व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदवत प्रतिष्ठाण कडकडीत बंद ठेवली होती. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bori Parbhani tension
Mumbai smallest house size : मुंबईकरांचे घर क्षेत्रफळामध्ये सर्वांत लहान!

झरीतही कडकडीत बाजारपेठ बंद व निषेध

झरी : बोरी येथील पोलिसांनी शिवभक्तांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गावात व्यापाऱ्यांनी नागरिकांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. शंभर टक्के बाजारपेठ बंद राहिल्याचे यावेळी पहावयास मिळाले असून झरीतील शिवभक्तांनी बोरी ठाण्यातील संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news