Chhatrapati Sambhajinagar Land Scam : बालाजी मठाच्या जमिनीवर अवैध प्लॉटिंग; एसआयटी चौकशीची मागणी

विकासकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मनपाचा पाठपुरावा
Land Scam
Land ScamPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : जाधववाडीतील श्रीराम मंदिर संस्थान बालाजी मठाच्या मालकीच्या वर्ग-२ (अहस्तांतरणीय) जमिनीवर परस्पर प्लॉट पाडून त्यांची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. महसूल विभाग आणि महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेल्या या व्यवहारांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि त्यामागील व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी नव्याने गठीत विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास करावा, अशी मागणी मनपाच्या अतिक्रमण विभागाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

महापालिका हद्दीतील मौजे जाधववाडी येथील गट क्रमांक १२४ आणि १२५ मध्ये मठाची जमीन आहे. वर्ग-२ प्रकारातील ही जमीन हस्तांतरणास प्रतिबंधित असतानाही त्यावर प्लॉटिंग करून विक्रीचे व्यवहार सुरू असल्याची माहिती मनपाला मिळाली. त्यानंतर अतिक्रमण हटाव पथकाने जागेवर जाऊन पाहणी केली.

Land Scam
Chhatrapati Sambhajinagar Crime : तब्बल १४ तरुणींचे लैंगिक शोषण करणारा नराधम दुबईतून जेरबंद

यावेळी महसूल विभाग अथवा मनपाची अधिकृत मंजुरी नसतानाही प्लॉटिंगसाठी रस्ते आणि अन्य सुविधांची निर्मिती केल्याचे निदर्शनास आले. संबंधितांकडे परवानगीची कागदपत्रे मागितली असता त्यांनी कोणतीही माहिती सादर केली नाही.

रस्ते, सुविधांवर हातोडा

मनपाच्या अधिकृत लेआऊटला मंजुरी नसताना तयार करण्यात आलेले रस्ते आणि इतर सुविधांवर अतिक्रमण विभागाने निष्कासनाची कारवाई केली. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान जागेवर निवासी अथवा अन्य प्रकारचे बांधकाम आढळले नाही. मात्र, प्लॉट विक्री सुरू असल्याचे पुरावे पथकाला मिळाले आहेत.

महिनाभरापासून गुन्हा दाखल नाही

नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी संबंधित विकासकाविरुद्ध सिडको एन-७ पोलिस ठाण्यात कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी मनपाने पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, महिनाभरापासून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे मनपाचे म्हणणे आहे.

Land Scam
Parbhani Shivai Bus Accident : शिवाई बसच्या मागील चाकाखाली चिरडून वृद्धाचा जागीच मृत्यू

दरम्यान, अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्त सविता सोनवणे यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. वर्ग-२ जमिनीचे स्वरूप लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसेच आवश्यकतेनुसार जमीनमालकाकडून संबंधित कागदपत्रे मागवून सखोल तपास करावा आणि नियमानुसार पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.