Chhatrapati Sambhajinagar Crime : तब्बल १४ तरुणींचे लैंगिक शोषण करणारा नराधम दुबईतून जेरबंद

संभाजीनगर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
Chhatrapati Sambhajinagar Crime
आरोपीला अटक करून आणणारे पोलिस पथक.pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : ज्या ठिकाणी कामाला आहोत, तेथील तरुणींना गोड बोलून मैत्रीच्या जाळ्यात ओढायचे, प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवायचे लैंगिक आणि अत्याचार करून लाखो रुपये उकळायचे, असा धक्कादायक प्रकार करणाऱ्या नराधमाला छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी थेट दुबईतून बेड्या ठोकून भारतात आणले आहे.

मोहम्मद माझीन अब्दुल राशीद (३४, रा. काजीवाडा, भडकल गेट) असे आरोपीचे नाव असून, त्याने आतापर्यंत तब्बल १४ तरुणींचे शोषण केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल होण्याच्या तीन महिने आधीच तो दुबईला पसार झाला होता. मात्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांनी इंटरपोल आणि सीबीआयच्या मदतीने 'रेड कॉर्नर' नोटीस जारी करून त्याचे प्रत्यार्पण घडवून आणले.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Rare Indian Vulture : १० हजार किमीचा प्रवास, भारतीय गिधाडाचे लातुरात दर्शन

आरोपी मोहम्मद माझीन हा सन २०२० मध्ये चिकलठाणा भागात एका महत्वाच्या कार्यालयात सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असताना तेथील एका २८ वर्षीय तरुणीशी त्याने ओळख वाढवली. लसाचे आमिष दाखवून त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर औरंगपुरा येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल १८ लाख रुपये उकळले.

पीडितेने लग्नाचा तगादा लावल्यावर माझीन, त्याची बहीण रामीन (वय २८) आणि आई समीना यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करत हाकलून दिले. दरम्यान, नोकरीचे कारण सांगून तो दुबईला पळून गेला. त्यानंतर अन्य एका महिलेचा फोन आल्यावर त्याने तिच्याशी लग्न करून फसवणूक केल्याचे सांगितले. पीडितेने १ डिसेंबर २०२५ रोजी सिटी चौक ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी माजीनसह त्याची आई आणि बहिणीविरुद्ध अॅट्रॉसिटी व अन्य कलमाखाली गुन्हा दाखल केला होता.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Parbhani Shivai Bus Accident : शिवाई बसच्या मागील चाकाखाली चिरडून वृद्धाचा जागीच मृत्यू

तपासादरम्यान त्याने इतर १३ तरुणींचेही अशाच प्रकारे शोषण करून पैसे उकळल्याचे, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीत केल्याचे समोर आले.

शहर पोलिसांनी गाठले थेट दुबई

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून फरार आरोपीला दुबईतून बेड्या ठोकण्यासाठी कंबर कसली. आरोपी फरार असतानाच पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तांत्रिक तपासात माजीन दुबई येथे असल्याचे निष्पन्न होताच न्यायालयाकडून 'स्टैंडिंग वॉरंट' मिळवण्यात आले. पोलिस आयुक्तांनी राज्याचे पोलिस महासंचालक, केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, सीबीआय (एनसीबी-नवी दिल्ली) आणि सीआयडीशी समन्वय साधून इंटरपोलमार्फत आरोपीविरुद्ध 'लूक आऊट' आणि 'रेड कॉर्नर नोटीस' प्रसिद्ध केली.

भारत आणि यूएईमधील प्रत्यार्पण करारानुसार अबुधाबी पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी त्याला दुबईत ताब्यात घेतले. परिमंडळ-१ चे उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, सिटी चौक ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे, अंमलदार सुरेश बोडखे व अमोल सोनटक्के यांच्या पथकाने दुबईला जाऊन आरोपीचा ताबा घेतला.

लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा संशय

आरोपी माजीन याने पीडित तरुर्णीसोबत अत्याचार करण्यापूर्वी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्याने एका पीडितेशी लग्नही केले होते; असे आणखीही प्रकार असण्याची शक्यता आहे. मात्र, समाजात बदनामी होण्याच्या भीतीने अनेक पीडित तरुणी अद्याप तक्रार देण्यासाठी पुढे आलेल्या नसाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार 'लव्ह जिहाद'चाच एक भाग असू शकतो, असा संशय सूत्रांनी व्यक्त केला असून त्या दिशेने सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.