Parbhani Shivai Bus Accident : शिवाई बसच्या मागील चाकाखाली चिरडून वृद्धाचा जागीच मृत्यू

परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भीषण अपघात
Accident
AccidentFile Photo
Published on: 
Updated on: 

परभणी : शहरातील अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात शनिवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई बसच्या मागील चाकाखाली सापडून एका ७४ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला ७२ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाला. या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली.

भर चौकात घडलेल्या या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला.बापूराव तुळशीराम निर्वळ (वय ७४, रा. धर्मापुरी, ता. परभणी) असे मृत वृद्धाचे नाव असून, शंकर डोंबे (वय ७२) हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बापूराव निर्वळ आणि शंकर डोंबे हे दोघे शनिवारी पगाराचे पैसे घेण्यासाठी परभणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आले होते. बँकेतील काम आटोपल्यानंतर पैसे घेऊन ते आपल्या गावी परत जाण्यासाठी निघाले.

Accident
Beed Teacher Recruitment Scam : बीड जिल्ह्यातील २१८ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडित

रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातून पायी जात होते. याच दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची शिवाई बस( क्रमांक एम एच ४९, बी झेड ९३७४) ही पुतळ्याला वळसा घालून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी यू-टर्न घेत होती. वळण घेत असतानाच दोन्ही पादचारी बसच्या मागील चाकाखाली सापडले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, बापूराव निर्वळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर शंकर डोंबे हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमी शंकर डोंबे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती आणि सतत वर्दळ असलेल्या पुतळा परिसरात हा अपघात घडल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Accident
Ahilyanagar Municipal Corporation Recruitment: अहिल्यानगर महापालिकेतील ४५ पदांची भरती रखडली; टीसीएसला बदलण्याच्या हालचाली
  • बसचालकाचे वळण घेतानाचे नियंत्रण, रस्त्यावरील पादचाऱ्यांची वर्दळ आणि चौकातील वाहतुकीची परिस्थिती या अनुषंगाने अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होणे आवश्यक आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.