Chhatrapati Sambhajinagar Bakwalnagar house burglaries|दिवाळीसाठी गावी गेलेल्या कामगारांची पाच घरे फोडली

Bakwalnagar house burglaries during Diwali vacation- एक लाखांची रोकड, चांदीचे दागिने सुरक्षित; बकवालनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ
Theft
TheftFile Photo
Published on: 
Updated on: 

वाळूज, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीनिमित्त कामगार कुटुंबासह गावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी नायगाव येथील बकवालनगरमध्ये एकाच रात्री पाच बंद घरे फोडली. शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी घरातील साहित्याची उचकापाचक केली. मात्र, एक लाख रुपयांची रोकड आणि चांदीचे दागिने सुरक्षित राहिले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

बकवालनगरमधील गल्ली क्रमांक दोनमध्ये बशीर शेख यांच्या खोल्यांत शैलेश प्रभुने, नीलेश प्रभुने (रा. खामगाव, जि. बुलढाणा) आणि राहुल लोखंडे हे कामगार भाड्याने राहतात. दिवाळीसाठी ते घरांना कुलूप लावून गावी गेले होते.

Theft
Chhatrapati Sambhajinagar | दिव्यांग भवनाच्या विस्तारासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा २० कोटींचा प्रस्ताव

ही संधी साधून चोरट्यांनी प्रथम शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर बंद घरांचे कुलूप तोडून कपाटे व साहित्याची उचकापाचक केली. शैलेश प्रभुने यांनी वाहन विक्रीतून मिळालेले एक लाख रुपये कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवले होते. मात्र, चोरट्यांना ही रोकड सापडली नाही. चांदीचे दागिनेही सुरक्षित राहिले. रवि बकवाल यांच्या खोल्यांतील अन्य दोन भाडेकरूंची घरेही फोडण्यात आली.

Theft
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली

रात्री दीड ते अडीचदरम्यान हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. उपनिरीक्षक जोगस यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, पोलिस ठाण्यात अद्याप गुन्ह्याची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कामगार वसाहतीत गस्त वाढविण्याची मागणी

बकवालनगरमध्ये विविध कंपन्यांतील मोठ्या संख्येने कामगार राहतात. त्यांच्या वेगवेगळ्या पाळ्यांमुळे परिसरात वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे तालुकाधिकारी रमेश आरगडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.