Smbhaji Nagar News | बच्चू कडूंचा संभाजीनगरात एल्गार; कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी 24 जुलै रोजी 'चक्काजाम'

Smbhaji Nagar News | शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.
Bachchu Kadu
Bachchu Kadu Canva
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या बुधवार, दिनांक २४ जुलै रोजी, छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतुकीची मुख्य धमनी असलेल्या क्रांती चौकात भव्य 'चक्काजाम' आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष संभाजीनगरकडे लागले आहे.

Bachchu Kadu
Tankers Supply | ऐन पावसाळ्यात 79 टँकरने पाणीपुरवठा

काय आहेत प्रमुख मागण्या?

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या राज्यव्यापी आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू संभाजीनगर असणार आहे. सकाळी ठीक ११ वाजता क्रांती चौकात हजारो शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू होईल. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन प्रमुख मागण्यांवर जोर देण्यात येणार आहे:

  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी: सततच्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील अनिश्चिततेमुळे पिचलेल्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळावी, ही प्रहार संघटनेची जुनी मागणी आहे.

  • दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन: दिव्यांगांना स्वाभिमानाने जगता यावे आणि त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी मिळणारे तुटपुंजे मानधन वाढवून ते दरमहा सहा हजार रुपये करण्यात यावे.

आंदोलनाला राजकीय बळ

या आंदोलनाला केवळ शेतकरी आणि दिव्यांगांचाच नव्हे, तर विविध राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे आणि एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही नेते आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याने या चक्काजाम आंदोलनाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासनावरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Bachchu Kadu
Chhatrapati Sambhajinagar : सिडको उड्डाणपुलावरून उडी घेण्याचा महिलेचा प्रयत्न

प्रशासन सज्ज, शहराची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता

क्रांती चौक हा शहराचा मध्यवर्ती आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा चौक आहे. या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची दाट शक्यता आहे. या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून हजारो अंध, मूकबधिर, कर्णबधिर, बहुविकलांग आणि अस्थिव्यंग दिव्यांग बांधव सहभागी होणार आहेत.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा धडाका पाहता, पोलीस प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत क्रांती चौकात होणारा हा 'चक्काजाम' सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news