Water wastage : पाण्याचा अपव्यय टाळा, अन्यथा दंडात्मक कारवाई : आयुक्तांचा इशारा

पहिल्या चुकीला ५ हजार, दुसऱ्यांदा १० तर तिसऱ्यांदा २५ हजारांचा दंड
Water wastage
Water wastage : पाण्याचा अपव्यय टाळा, अन्यथा दंडात्मक कारवाई : आयुक्तांचा इशाराfile photo
Published on: 
Updated on: 

Avoid wastage of water, otherwise penal action will be taken: Commissioner warns

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पाण्याचा अपव्यय टाळा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे. नळाला पाणी आल्यानंतर त्याचा अनावश्यक वापर करणे, वाहने धुणे किंवा रस्त्यावर पाणी सोडणे आता नागरिकांना चांगलेच महागात पडणार आहे.

Water wastage
Cyber Crime : सायबर भामट्यांनी उकळलेले १ कोटी उद्योजकाला परत

पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिका थेट दंडात्मक कारवाई करणार असून पहिल्या वेळी ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार, तर तिसऱ्यांदा नियमभंग केल्यास तब्बल २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तिसऱ्यांदा नियमभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला जाणार आहे. १५ दिवसांच्या जनजागृतीनंतर १५ ऑक्टोबरपासून ही कारवाई सुरू करणार असल्याची माहिती गुरुवारी (दि.१) आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यंदा धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने जायकवाडी धरणात पाण्याची चांगली आवक झाली असून सध्या पाणीसाठा समाधानकारक आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती वेगळी आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा सध्या सुमारे ८० टक्के आहे.

गतवर्षी याच कालावधीत हा साठा ९८ टक्के होता. आगामी उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढण्याची शक्यता असल्याने आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील काही भागांत नळाला पाणी आल्यानंतर वाहने धुणे, रस्त्यावर पाणी मारणे तसेच नळाचे पाणी विनाकारण वाहू देण्याचे प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आले आहेत.

Water wastage
LCB raids : चिकलठाणा शिवारात लिंबाच्या झाडाखालील जुगाराचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळला

पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना होणारा हा अपव्यय रोखण्यासाठी आता केवळ समज देण्याऐवजी थेट दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले. तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने शहरातील काही भागांना चार दिवसांनी, तर काही भागांना सहा ते सात दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नळाला पाणी येण्याच्या दिवशी गरजेपुरते पाणी भरून घेतल्यानंतर तोट्या बंद ठेवाव्यात.

पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची गरज असल्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. पाण्याची नासाडी रोखण्याबरोबरच अनधिकृत नळजोडण्यांवरही महापालिकेची नजर राहणार आहे. अवैध नळजोडणी घेतलेल्या नागरिकांनी ती अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मनपाच्या तपासणीत अनधिकृत कनेक्शन आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा आयुक्त येडगे यांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासोबतच आपली नळजोडणी अधिकृत आहे की नाही, याचीही खात्री करून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

१५ दिवस जनजागृती

दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी महापालिका नागरिकांना १५ दिवसांची संधी देणार आहे. या कालावधीत घंटागाड्यांद्वारे पाणी बचतीचे आवाहन करण्यात येईल. त्याचबरोबर प्रचार-प्रसिद्धी करून नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत जागरूक केले जाणार आहे. ही मुदत संपल्यानंतर १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news