Cyber Crime : सायबर भामट्यांनी उकळलेले १ कोटी उद्योजकाला परत

आरटीओ चालानच्या नावाने एपीके फाईल पाठवून घातला होता गंडा
Cyber Crime
Cyber Crime : सायबर भामट्यांनी उकळलेले १ कोटी उद्योजकाला परतfile photo
Published on: 
Updated on: 

1 crore stolen by cyber criminals returned to entrepreneur

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सायबर भामट्यांनी उकळलेली १ कोटी रुपयांची रक्कम शहर पोलिसांच्या सायबर शाखेने गोठवून ती तक्रारदार एनव्हे बायोटेक प्रा. लि. या हेल्थ सप्लीमेंट ड्रिंक कंपनीचे मालक तरुण नंदकिशोर सोहिंदा (४३, रा. पन्नालाल नगर, न्यू उस्मानपुरा) यांना परत मिळवून दिली. आरटीओ चालानच्या नावाने पाठवलेल्या एका बनावट एपीके फाईलद्वारे ही फसवणूक करण्यात आली होती. यावेळी सोहिंदा यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

Cyber Crime
Sambhajinagar News : १,३५४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

याप्रकरणी उद्योजक तरुण सोहिंदा यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात नंबरवरून ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी आरटीओ चालान नावाची एक एपीके फाईल आली होती. ही फाईल उघडल्यामुळे त्यांचा मोबाईल फोन सायबर गुन्हेगारांनी हॅक केला. मोबाईल हॅक केल्यानंतर गुन्हेगाराने मालकाच्याच व्हॉट्सअॅपवरून कंपनीच्या अकाऊंटंटला मेसेज केला आणि एका इंडसइंड बँकेच्या खात्यावर तात्काळ १ कोटी रुपये पाठवण्याचे निर्देश दिले.

स्वतः मालकानेच मेसेज केल्याचा विश्वास वाटल्याने अकाऊंटंटने आरटीजीएस द्वारे १ कोटी त्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले. थोड्याच वेळात त्याच नंबरवरून पुन्हा ४ कोटी रुपये पाठवण्यासाठी मेसेज आला, एवढी मोठी रक्कम पुन्हा मागितल्याने अकाऊंटंटला संशय आला आणि त्याने तत्काळ मालकाला थेट कॉल करून खात्री केली. तेव्हा मालकाचा फोन हॅक झाल्याचे आणि फसवणूक झाल्याचे समोर आले.

Cyber Crime
Flying school : विमानतळावर फ्लाइंग स्कूलचे काम अंतिम टप्प्यात; डिसेंबरपासून वर्ग सुरू

सायबर पोलिसांची तत्परता

तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. सायबर टीमने इंडसइंड बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गुन्हेगाराचे खाते फ्रीज केले. तसेच, या खात्यावरून इतर ज्या बँकांमध्ये पैसे वळवण्यात आले होते, ती खाती देखील गोठवण्यात आली. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे गुन्हेगाराला पैसे काढता आले नाहीत आणि संपूर्ण एक कोटीची रक्कम गोठवण्यात यश आले. ही रक्कम न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदार तरुण सोहिंदा यांना परत करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात सायबर ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक गणेश गिरी आणि त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news