

Autorickshaw transporting beef vandalized by mob
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
गोमांस वाहतूक करणाऱ्या प्रवासी ऑटो रिक्षाला गोरक्षकांनी शुक्रवारी (दि.५) सकाळी वाळूज एमआयडीसीत थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने रिक्षा न थांबवता तो पुढे घेऊन जात असताना गोरक्षकांसह जमावाने पाठलाग करून रिक्षा थांबवून तिची तोडफोड केली.
यावेळी जमावाने अंबेलोहळ येथील कत्त-लखान्यावर कारवाईची मागणी करत रस्त्यावर तासभर ठिय्या आंदोलन केले. यामुळे रस्त्याच्या दुतवर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वाळूज एमआयडीसीतून एक ऑटो रिक्षामधून गोमांसाची वाहतूक केल जात असल्याची माहिती शुक्रवारी गोरक्षकांना मिळाली होती. सकाळ पावणेनऊ वाजेच्या सुमारास त्यांना विटाव फाट्याकडून प्रवासी वाहतूक करणारी ऑटो रिक्षा येत असल्याचे दिसून आले यावेळी गोरक्षकांनी रिक्षा चालकास रिक्ष थांबविण्यास सांगितले, मात्र तो जोगेश्-वरीच्या दिशेने रिक्षा सुसाट घेऊन जात असताना गोरक्षकांनी विप्रो कंपनीसमोन रिक्षा थांबविली व त्यांनी रिक्षाची तपासण केली.