Aurangpura renamed Sambhaji Peth : औरंगपुरा भागाचे नाव आता संभाजीपेठ

मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर
Aurangpura renamed Sambhaji Peth
महापालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत महापौर राजूरकर यांनी प्रस्ताव पारित करत संभाजीपेठ नामकरणास मंजरी दिल्याची घोषणा केली. यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आदी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराचे मध्यवर्ती ठिकाण आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या औरंगपुरा परिसराचे नाव आता अधिकृतपणे संभाजीपेठ झाले आहे. महापालिकेच्या सोमवारी (दि.२०) पार पडलेल्या सर्वसाध ारण सभेतील चर्चेनंतर बहुमताने हा महत्त्वाचा निर्णय मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी संभाजीपेठ असे अधिकृत नाव देण्याच्या प्रस्तावावरून सभेत जोरदार वादंग झाले. या प्रस्तावाला उबाठाचे नगरसेवक राशिद मामू यांनी तीव्र विरोध दर्शविला. अखेर चर्चेअंती प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली.

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा परिसराचे नामकरण संभाजीपेठ असे करावे, असा प्रस्ताव स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी सोमवारी सभागृहात मांडला. अनेक वर्षांपासून नागरिक या भागाला संभाजीपेठ म्हणून संबोधत असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी केली. मात्र या प्रस्तावावर शिवसेना (उबाठा) चे नगरसेवक रशिद मामू यांनी आक्षेप घेतला. शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या अन्य नेत्यांची नावे विचारात घ्यावीत, असे मत त्यांनी मांडले.

Aurangpura renamed Sambhaji Peth
Pune mayor Manjusha Nagpure: पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे बिनविरोध; विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला

तसेच, मोठ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे नाव लहान भागाला देणे योग्य नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. या विरोधावरून सभागृहात वातावरण तापले. मकरिये यांनी थेट विरोध स्पष्ट करण्याची मागणी करत, पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी प्रमोद राठोड यांनी गटनेत्यांनी अधिकृत भूमिका मांडावी, अशी मागणी केली. तर नगरसेवक राजू वैद्य यांनी टोला लगावत, पक्षाची भूमिका अजूनही काहींना समजलेली नाही, अशी टीका केली.

वाद अधिक वाढत असल्याचे पाहून शिवसेना (उबाठा) चेच नगरसेवक सचिन खैरे यांनी वेगळी भूमिका घेत प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला. नागरिकांमध्ये प्रचलित असलेले नाव अधिकृत करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे उबाठा गटातील अंतर्गत मतभेद समोर आले. दीर्घ चर्चेनंतर महापौर राजूरकर यांनी प्रस्ताव पारित करत संभाजीपेठ नामकरणास मंजुरी दिल्याची घोषणा केली.

तसेच एन-६ मधील उद्यानाला ओंकार उद्यान, सातारा भागातील चौकाला श्री प्रल्हाद महाराज चौक, मुकुंदवाडीतील क्रीडा संकुलाला जय भवानी क्रीडा संकुल, पैठण रोडवरील मार्गाला संतश्रेष्ठ एकनाथ महाराज मार्ग, द्वारकानगरीतील सभागृहाला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सभागृह व भगतसिंगनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकाला तुळजाभवानी चौक, सिटी चौक ते गुलमंडी मार्गावरील चौकांना श्री कृष्ण सुदामा चौक असे नामकरण करण्यात आले.

Aurangpura renamed Sambhaji Peth
Thane Municipal Budget: ठाणे महापालिकेत भाजप-शिंदे सेनेत वाद; निधी वाटपावरून सभागृहात खडाजंगी

संभाजीपेठ नावाला नागरिकांचा पाठिंबा

शहरातील औरंगपुरा परिसराला गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीपेठ म्हणून ओळखले जाते. व्यापारी, नागरिक तसेच स्थानिकांमध्ये हे नाव प्रचलित असल्याने अधिकृत नामकरणाची मागणी सातत्याने होत होती. महापालिकेच्या निर्णयामुळे या मागणीला अखेर शिक्कामोर्तब झाले.

Aurangpura renamed Sambhaji Peth
Sambhajinagar News : रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे सुरूच राहणार

सभागृहात उबाठा गटात मतभेद

नामकरणाच्या मुद्द्द्यावर शिवसेना (उबाठा) नगरसेवकांमध्ये मतभेद स्पष्ट दिसून आले. एका बाजूला रशिद मामू यांनी विरोध दर्शविला, तर दुसरीकडे सचिन खैरे यांनी उघडपणे समर्थन केले. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणांवर याचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news