Sambhajinagar Crime News : किरकोळ वादातून चाकू, कोयत्यांनी हल्ले

दिवाळीच्या उत्सवात घडल्या हल्ल्यांच्या आठ घटना
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : किरकोळ वादातून चाकू, कोयत्यांनी हल्लेfile photo
Published on: 
Updated on: 

Attacks with knives and coyotes over minor dispute

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या उत्सवात शहरात सर्वत्र आनंद आणि रोषणाईचे वातावरण असताना दुसरीकडे किरकोळ वादातून चाकू, कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ले करण्याच्या घटनांनी शहर हादरले आहे. फटाके फोडण्यावरून वाद, जाब विचारताच मारहाण आणि त्यानंतर थेट हल्ला. असे चित्र दिवाळी दरम्यान शहरात पहायला मिळाले. आठ वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणांवर चाकू, कोयते आणि लोखंडी रॉडने हल्ले करण्यात आले.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar News : रोहित पठारे हत्या प्रकरणावरून काँग्रेस आमदारांनी ओढले ग्रामीण पोलिसांवर ताशेरे

छावणीतील नेहरू पुतळ्याजवळ ८ नोव्हेंबर रोजी रात्री शेख अफ्फान शेख उमर यांच्या दुचाकीवर तिघांनी फटाके फेकले. जाब विचारल्याने शेख जाहीद यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सिडकोतील म्हाडा कॉलनी, मर्तुजापूर येथे ऋषिकेश शेजुळ यांच्यावर राजन इंगोले, अभी ऊर्फ बॉबी मोरे, संजय जाधव १र्फ बंबई व साथीदारांनी हल्ला केला. राजनने चाकूने, तर बॉबीने कोयत्याने वार केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुकुंदवाडीतील पूर्व प्रकाशनगर येथे ९ नोव्हेंबरला अरुण पडुळ यांच्या घरासमोर वाद झाला. यावेळी बॉबी मोरे याने अरुण यांच्या डोक्यात दगड मारला, तर राजन इंगोले याने त्यांच्या वडिलांच्या पोटात चाकू भोसकला. इतर साथीदारांनीही मारहाण केली. दुसऱ्या घटनेत तोरणागड नगरमध्ये मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या ऋतिक पाटील यांच्या डोक्यावर राजन इंगोले याने कोयत्याने वार केला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच परिसरातील संतोषिमाता नगरमध्ये चुलत बहिणीच्या अंगावर फटाका टाकल्याचा जाब विचारणाऱ्या १७ वर्षीय रोहित बावरीया याच्या गालावर सागर आठवले याने धारदार शस्त्राने वार केला.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar News : जबरी चोरी करणारे दोघे गुन्हे शाखेकडून अटक

शहरभर हल्ल्याच्या घटना

या बरोबरच सातारा परिसरातील महुनगरमध्ये वाहनांवर फटाका टाकण्याच्या वादातून योगेश आहेर याने रोहित गंगावणे याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. मध्यस्थी करणाऱ्या प्रथमेश नरवडे याच्यावरही चाकूने वार केला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जवाहरनगरच्या सौजन्यनगरमध्ये ८ नोव्हेंबरला फटाके फोडण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. सनी निकाळजे, अभिषेक निकाळजे, सुनील निकाळजे यांच्यासह अन्य व्यक्तींवर मारहाण व दगडफेकीचे आरोप असून, सनीने चाकूने वार केल्याची तक्रार आहे. बेगमपुरा येथील घाटी क्वार्टरमध्ये वाहनांजवळ फटाके फोडण्यास विरोध केल्याने दोन शेजारी कुटुंबांत वाद झाला. शेख शहाबाज याने सुमित रवींद्र सौदे यांच्या हातावर आणि बरगडीत चाकूने वार केले. या घटनेत महिलाही जखमी झाल्या असून परस्परविरोधी गुन्हे बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.