BMD Test : तुमची हाडे ठिसूळ तर नाही ना ? घाटीत करा तपासणी

अर्थो विभागातर्फे २८ जुलैपर्यंत बोन मिनरल डेन्सिटी शिबीर
BMD Test
BMD Test : तुमची हाडे ठिसूळ तर नाही ना ? घाटीत करा तपासणीfile photo
Published on
Updated on

Are your bones brittle? Get them checked at Ghati

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटी अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे आयोजित बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी शिबिराचे बुधवारी (दि.२२) अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. सलग आठवडाभर म्हणजेच २८ जुलैपर्यंत या शिबिरात रुग्णांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

BMD Test
Vitthal-Rukmini Temple : वाळूज पंढरपुरात आषाढीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल

अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागातर्फे डॉ. एम. बी. लिंगायत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे. घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभागाच्या ओपीडी ११६ मध्ये दररोज ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.

तसेच २४ जुलै पैठण येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, २७ जुलै रोजी गंगापूर आणि कन्नड आदी ठिकाणी ही सेवा दिली जाणार आहे. यावेळी या सेवेचा गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुक्रे यांनी केले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. के. डी. गर्कल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत, विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, अभ्यागत समिती सदस्य राजू अहिरे, प्रा. डॉ. अनिल धुळे, डॉ. गजानन देशमुख, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. नीलेश कचनेरकर, डॉ. प्रवीण रणवीर, ओपीडी इन्चार्ज निर्मला शिंदे, सीमा भोसले आर्दीसह सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.

BMD Test
Sambhajinagar News : नव्या जलवाहिनीतून सिडकोला पाणीपुरवठा

बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे काय ?

बीएमडी ही एक वैद्यकीय चाचणी आहे जी आपल्या हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांचे प्रमाण मोजते. यावरून हाडे किती मजबूत आहेत किंवा ती ठिसूळ झाली आहेत का, हे ठरवता येते. ही तपासणी छोट्या मशीनद्वारे सामान्यतः हाताच्या किंवा पायाच्या घोट्याची, हाडांची घनता मोजली जाते. सांधेदुखी, पाठदुखी किंवा हाडांच्या आजारांचे वेळीच निदान करणे आणि फॅक्चरचा धोका टाळणे, हा तपासणीचा उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news