Sambhajinagar News : नव्या जलवाहिनीतून सिडकोला पाणीपुरवठा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचे साधले औचित्य
Sambhajinagar News
Sambhajinagar News : नव्या जलवाहिनीतून सिडकोला पाणीपुरवठाfile photo
Published on
Updated on

Water supply to CIDCO through the new pipeline

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी (दि. २२) नव्या जलवाहिनीतून सिडको एन-५ आणि मिसारवाडी येथील जलकुंभांमध्ये पाणी घेण्यात आले. त्यामुळे तब्बल ३५ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नव्या योजनेतून अखेर शहरवासीयांना पाणी मिळाल्याने परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. येत्या ३० जुलैपर्यंत संपूर्ण सिडको हडको भागासह मिसारवाडी, हर्सल, जटवाडा या वसाहतींना जादा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Sambhajinagar News
Rain Update : शहरात दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक हे दोन दिवसांपासून शहरात तळ ठाकून आहेत. त्यांनी योजनेच्या कामाचा आढावा घेत सर्व कामांची स्थळपाहणी केली. यानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एमजेपी आणि जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीने नक्षत्रवाडी एमबीआरमधून शहरात २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे पाणी आणण्यासाठी एमबीआर ते हसूल अशी १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीची चाचणी घेऊन त्यातून बुधवारी एन-५ सिडको आणि मिसारवाडी या दोन जलकुंभांमध्ये पाणी घेण्यात आले.

दरम्यान, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते व्हॉल्व्ह फिरवून पाणी सुरू करण्यात आले. पाणी जलकुंभात पडताच, नागरिकांनी जल्लोष साजरा करत आतषबाजी केली. यावेळी डॉ. भागवत कराड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, महेंद्र गोगुलोथू, नगरसेवक शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, मनोज गांगवे, माधुरी अदवंत, महेश माळवतकर यांची उपस्थिती होती.

Sambhajinagar News
Vitthal-Rukmini Temple : वाळूज पंढरपुरात आषाढीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल

एमबीआरमध्ये १.१५ कोटी लिटर पाणी

यावेळी माहिती देताना जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथू म्हणाले, नक्षत्रवाडी येथील एमबीआरमध्ये १ कोटी १५ लाख लिटर (११.५ एमएलडी) पाणी आहे. या एमबीआरमधून १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवा-हिनीतून हर्मूलपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. एमबीआर ते हर्मूलपर्यंत १८ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. एकावेळेस चार एमएलडी या प्रमाणे दिवसातून तीन वेळा (एकूण १२ एमएलडी) पाणी उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनेतून ३५ एमएलडी पाणी वाढवून दिले जात आहे, त्यात १२ एमएलडी पाण्याची भर पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news