

Manikrao Kokate Controversial Statement
छत्रपती संभाजीनगर : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिले, असे खुद्द कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हणत कृषी खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांनी कृषी खात्याची महती गाताना ओसाड गावच्या पटीलकीचा उल्लेख केला आहे. यामुळे कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता नवा वाद ओढावून घेतला आहे. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, असं म्हणत त्यांनी कृषी खात्यावरच नाराजी व्यक्त केली आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून बेताल वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील दौऱ्यात त्यांनी नवं विधान करून वादाचं आणखी एक बीज रोवलं. अजित पवारांनी मला हे मंत्रिपद दिलं, पण कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे, असं त्यांनी म्हटले आहे.
शुक्रवारीदेखील माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये असेच एक विधान केले होते. राज्यात मे महिन्यातच मान्सूनचे आगमन झाले. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शुक्रवारी कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांच्या मागणीबाबत प्रश्न विचारले असता कोकाटे म्हणाले, ढेकळांचे पंचनामे करायचे का, जे कांदे वावरात असतील त्याचे पंचनामे केले जातील, घरात आणून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे कसे करणार?, अशा आशयाचे विधान करत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.
१. कोकाटेंनी यापूर्वी शेतकऱ्यांचा उल्लेख 'भिकारी' असा केला होता.
२. कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते, असं विधान केलं होतं.
३. ढेकळांचे पंचनामे करायचे का?
४. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी