Ambadas Danve : अब्रूच नसणाऱ्यांच्या दाव्याला मी भीक घालत नाही

खासदार भुमरेंच्या चालकाच्या नोटिशीवर पलटवार
Ambadas Danve |
अंबादास दानवे.File Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ज्यांच्याकडे अबू असते, तेच अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. त्यामुळे खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाने दाखल केलेल्या १ कोटी रुपयांच्या दाव्याला मी फुकटचीही भीक घालत नाही. माझ्याकडे या प्रकरणाचा मखमंग मसालाफ तयार असून, अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याआधी त्यांनी मी केलेल्या १,१५० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांचे उत्तर द्यावे, असा अत्यंत आक्रमक पलटवार आणि सडेतोड प्रत्युत्तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी (दि. २८) दिले.

खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांनी वकिलामार्फत अंबादास दानवे यांना एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा (नोटीस) पाठवला आहे. सात दिवसांच्या आत दानवे यांनी आपले आरोप आणि विधाने मागे घ्यावीत, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. या नोटिशीनुसार, दानवे यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी आणि खळबळ उडवून देण्यासाठी खासदार भुमरे यांच्या नावाचा वापर करून बदनामी केली आहे.

Ambadas Danve |
Stray dog attack : पाच मोकाट कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; नारेगावात घराच्या ओट्यावरून ओढत नेले

चालक जावेद शेख याने मौजे जटवाडा (जोगवाडा) येथील गट क्रमांक १७४ (जुना सर्व्हे नंबर ८९) या जमिनीचा हिबानामा करून १,१५० कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला, फअसा खोटा आरोप दानवे यांनी केल्याचा दावा शेख यांनी केला आहे. मुळात अशी कोणतीही मालमत्ता अस्तित्वात नसताना शहानिशा न करता दानवे यांनी माध्यमांना खोटी माहिती दिल्याचे नोटिशीत म्हटले आहे. या नोटिशीवर शनिवारी पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे यांनी आक्रमक शैलीत समाचार घेतला.

ते म्हणाले की, ङ्गमी अजून ती नोटीस वाचलेली नाही, ती थेट माझ्या वकिलांकडे पाठवून दिली आहे. मी स्वतः वाट पाहतोय की त्यांनी त्या दाव्यात नेमके काय काय लिहिले आहे. कारण माझ्याकडेही या प्रकरणाचा खूप काही मसाला आहे. मी या नोटिशीला कायदेशीर आणि योग्य ते उत्तर निश्चित देईन. पण त्याआधी खासदार भुमरे आणि त्यांच्या चालकाने मी जे गंभीर आरोप केले आहेत, त्याचे उत्तर जनतेला द्यावे. ज्यांची मुळात अबूच नाही, त्यांच्या अशा दाव्यांना मी कवडीचीही किंमत देत नाही.

Ambadas Danve |
Sangli News : जतमधील हिप्परकर टोळी दोन वर्षांसाठी तडिपार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news