MLA Satish Chavan : अजितदादांचे नसणे अधिक वेदनादायी

बारामतीत अजितदादांच्या स्मृतिस्थळास अभिवादन
MLA Satish Chavan
MLA Satish Chavan : अजितदादांचे नसणे अधिक वेदनादायीfile photo
Published on: 
Updated on: 

Ajitdada’s absence is all the more painful: MLA Chavan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आमदार सतीश चव्हाण यांनी रविवारी (दि. १) बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळास भेट देऊन अभिवादन केले. निवडणुकीतील पराभवापेक्षा अजितदादांची अनुपस्थिती अधिक वेदनादायी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

MLA Satish Chavan
Workers Safety : अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कामगारांची सुरक्षा अधिक 'भक्कम' !

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे सलग तीन टर्म, म्हणजेच १८ वर्षे आ. सतीश चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केले. यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जय-पराजय हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत त्यांनी निकाल स्वीकारला. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान अजितदादांची उणीव प्रकर्षाने जाणवल्याचे चव्हाण म्हणाले.

MLA Satish Chavan
Gunthewari : गुंठेवारी अंतिम मुदतीत चार हजार संचिका दाखल

अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर राजकीय प्रवासातील आधारस्तंभ होते. त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, दिलेली साथ आणि दाखवलेला विश्वास यांचे स्मरण करताना चव्हाण भावुक झाले. दादांची साथ असताना संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळायचे. आज त्यांच्या आठवणी, विचार आणि शिकवण हाच पुढील वाटचालीचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.