Gunthewari : गुंठेवारी अंतिम मुदतीत चार हजार संचिका दाखल

एकाच दिवसात साडेतीन कोटींचा महसूल : आतापर्यंत दहा हजार संचिका
Gunthewari
Gunthewari : गुंठेवारी अंतिम मुदतीत चार हजार संचिका दाखलfile photo
Published on: 
Updated on: 

Four thousand files submitted by the 'Gunthewari' (regularization of unauthorized plots) deadline

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुंठेवारी नियमितीकरणासाठी महापालिकेने जाहीर केलेल्या सवलत योजनेच्या अखेरच्या दिवशी नागरिकांनी अक्षरशः गर्दी केली. ३१ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात तब्बल चार हजार संचिका महापालिकेत दाखल झाल्या, तर साडेतीन कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. शेवटच्या दिवसाच्या या प्रतिसादामुळे गुंठेवारी नियमितीकरण मोहिमेला मोठी गती मिळाली आहे.

Gunthewari
Drought Relief Fund : राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदतनिधीस

महापालिकेने १५ जुलैपासून गुंठेवारी नियमितीकरणासाठी विशेष सवलत योजना लागू केली होती. यामध्ये खुल्या भूखंडांच्या नियमितीकरणासाठी बेटरमेंट शुल्कात ५० टक्के सवलत, तर बांधकामांसाठी आकारण्यात येणारे प्रशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सुरुवातीपासूनच अर्ज दाखल करण्यास प्रतिसाद दिला.

३१ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर गुंठेवारी विभागात अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर शेवटच्या काही दिवसांत नागरिकांची गर्दी वाढली होती. ३१ ऑक्टोबर रोजी तर दिवसभर अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची रीघ लागली होती. दिवसभरात सुमारे चार हजार संचिका जमा झाल्या.

या मोहिमेत आतापर्यंत दाखल झालेल्या संचिकांची संख्या सुमारे दहा हजारांवर पोहोचली असून, अंदाजे ११५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दरम्यान, शेवटच्या दिवशी महापालिका कार्यालयात जमा झालेल्या साडेतीन कोटी रुपयांव्यतिरिक्त एचडीएफसी बँकेच्या विविध शाखांमध्येही नागरिकांनी शुल्क भरले आहे.

Gunthewari
CM Devendra Fadnavis : नव्या सिंथेटिक ट्रॅकवरून घडतील पदकविजेते खेळाडू

मात्र, बँकांमधील जमा रकमेचा अधिकृत तपशील अद्याप महापालिकेला प्राप्त झालेला नाही. ही माहिती सोमवारी मिळण्याची शक्यता असल्याने एकूण महसुलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.