

Agriculture in crisis as rains stay away
निलजगाव: पैठण तालुक्यातील निलजगावसह परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. परीसरात कापूस, तूर, मका, सोयाबीन व बाजरी या पिकासह मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाअभावी शेतातील पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणे, कीटकनाशके, खते तसेच मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून ती जोमाने वाढत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांना सध्या पावसाची अत्यंत आवश्यकता असून, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. परिसरातील शेतकरी आतुरतेने जीवदान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देवगाव रंगारीत पावसासाठी साकडे
देवगाव रंगारी : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारीसह परिसरात पावसाने ओढ शेतकरी चिंतेत आहे. शिवारातील पिकांकडे पाहताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असून, आभाळाकडे लागलेल्या नजरा वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहेत.
पेरणीनंतर सुरुवातीला झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची आशा धरली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापूस, मका, तूर यांसह विविध पिकांना पावसाची आवश्यकता आहे. वेळेवर पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, आधीच वाढलेला शेतीचा खर्च पाहता शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकण्याची चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर देवगाव रंगारी येथील महिला मंडळाच्या वतीने महादेव मंदिरात जलाभिषेक करून भगवान महादेवाला पावसासाठी साकडे घालण्यात आले. महिलांनी पूजा-अर्चा करून परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, पिकांना जीवदान मिळावे, जलस्रोत भरावेत आणि शेतकरी तसेच व्यापारी वर्गावरील आर्थिक संकट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना केली.
खंडाळा येथे महादेवला जलाभिषेक
खंडाळा पाऊस पडावा म्हणून खंडाळा येथील जय श्रीराम गणेश मंडळाच्या महिला सदस्यांनी सोमवारी (दि. सात) महादेव मंदिरात एकत्र येऊन महादेवाला साकडे घातले व जलाभिषेक केला.
खंडाळा परिसरात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पेरणी होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही जेमतेम पावसावर पिके जगत आहे. सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, तूर ही पिके माना टाकल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची देखील समस्या भेडसावत असल्याने अशा परिस्थितीत देवाकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नसल्याने गावातील महिलांनी पुढाकार घेतला.
पावसाअभावी बाजारपेठेवरही परिणाम
शेतकऱ्यांच्या संकटाची झळ गावातील बाजारपेठेला बसला आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठेची उलाढाल मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला की किराणा, कपडे, कृषी साहित्य, बियाणे, खते, औषधे तसेच इतर वस्तूंची खरेदी वाढते. मात्र, पिकांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने ग्राहकांकडून खर्चाला लगाम लागला आहे. परिणामी छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.
जलाभिषेक केला. मंदिराच्या गाभाऱ्यात गुडघाभर पाणी साचेपर्यंत महिलांनी सतत जलाभिषेक सुरू ठेवला. महिलांनी आणलेल्या पाण्याने गाभारा पूर्णपणे भरून गेला. महिलांनी वरुनराजा बरस बरस, महादेवा पाणी दे असा जयघोष करत सामूहिक प्रार्थना केली. यावेळी बालगोपाळ, युवक व महिलांनी महादेवाला २३१ हंड्याने जल अर्पण केले.
याप्रसंगी हिराबाई जाधव, नयना जाधव, वैष्णवी जोशी, गायत्री जंगम, सुनिता बोरडे, सुनिता जाधव, आरती जाधव, शिवानी जाधव, व्दारकाबाई वेळंजकर, शीतल जाधव, योगीता जेजूरकर, ज्योती शिंदे, प्रणव भावसार, नरेंद्र वेळंजकर, संकेत जाधव, शिवा जंगम, प्रतीक भावसार, रितेश जाधव आदींसह