Sambhajinagar News : 'स्कोडा' करणार 'जेएसडब्ल्यू'च्या साथीने वाहन निर्मिती

सामंजस्य करार : संभाजीनगरात ईव्ही, प्लग-इन हायब्रीड, हायब्रीड प्रवासी वाहनांचे होईल उत्पादन
Sambhajinagar News
Sambhajinagar News : 'स्कोडा' करणार 'जेएसडब्ल्यू'च्या साथीने वाहन निर्मितीfile photo
Published on
Updated on

Skoda to manufacture vehicles in partnership with JSW

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया आणि जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लिमिटेड (जेएसडब्ल्यू) यांनी भारतात धोरणात्मक संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी बिगर-बंधनकारक सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या भागीदारीचा थेट फायदा छत्रपती संभाजीनगरमधील ऑटोमोबाईल हबला होणार असून, शेंद्रा येथील स्कोडाच्या प्रकल्पात आता जेएसडब्ल्यूच्या सोबतीने वाहननिर्मिती केली जाणार आहे.

Sambhajinagar News
Marathwada Lack of Rain : मराठवाड्यात पावसाअभावी बिकट स्थिती

यासंबंधी' ऑटोकार प्रोफेशनल'ला दिलेल्या एका स्वतंत्र अधिकृत निवेदनात, स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रस्तावित द्विपक्षीय भागीदारी संयुक्त नियंत्रणावर आधारित असेल. जलद आणि प्रभावी निर्णयप्रक्रियेला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने, यात सुस्पष्ट भूमिका आणि कार्यप्रणाली असतील. या सहकार्याचा भर उत्पादन श्रेणीचा विस्तार करणे, JSW स्थानिकीकरण अधिक दृढ करणे आणि भारतातील उत्पादन तसेच संशोधन व विकास क्षमता मजबूत करण्यावर असेल. दरम्यान, दोन्ही निवेदनांमध्ये प्रस्तावित भागधारणेचा किंवा गुंतवणुकीचा खुलासा केलेला नाही.

स्कोडाला भारतात अधिक जम बसवण्यासाठी मोठ्या सहकार्याची गरज होती. यासाठी त्यांनी स्थानिक जेएसडब्ल्यूची निवड केली आहे. या कराराचा फायदा संभाजीनगरला देखील होणार आहे. स्कोडाचा पुण्याच्या चाकण येथे वाहननिर्मिती प्रकल्प आहे तर संभाजीनगरच्या शेंद्रा येथे एसेम्बली प्रकल्प आहे. तर दुसरीकडे जेएसडब्ल्यूदेखील संभाजीनगरमध्ये दिवाळीपर्यंत आपल्या नूतन प्रकल्पाला सुरुवात करत आहे. आता या करारानुसार स्कोडा आणि जेएसडल्ब्यू एकत्रितपणे देखील उत्पादन करणार आहेत. दोघांच्या एकतरी कामामुळे अधिकचे उत्पादन करणे शक्य होणार आहे.

Sambhajinagar News
मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६ जाहीर; अभिनेत्री वर्षा उसगावकर मुख्य अतिथी

दरम्यान, 'ऑटोकार प्रोफेशनल ने दिलेल्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यूकडून होणारी संभाव्य गुंतवणूक, फोक्सवॅगन ग्रुपच्या देशासाठी प्रस्तावित असलेल्या 'इंडिया मेन प्लॅटफॉर्म' या इलेक्ट्रिक वाहन रचनेवर आधारित उत्पादनांना निधी पुरवण्यासाठी मदत करण्याची शक्यता आहे.

दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक चर्चा

हा उपक्रम भारतीय आणि निर्यात बाजारपेठांसाठी प्रवासी वाहनांचा विकास, उत्पादन आणि विक्री करण्यावर लक्ष केंद्रित करेल. जेएसडब्ल्यू ग्रुपने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, प्रस्तावित करारांतर्गत ज्वलन इंजिन, इलेक्ट्रिक वाहने, प्लग-इन हायब्रीड आणि हायब्रीड वाहनांचा समावेश असणार आहे. दरम्यान, हा सामंजस्य करार बंधनकारक नसून दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे. अद्याप कोणताही निश्चित करार झालेला नसल्याचे जेएसडब्ल्यू ग्रुपच्या प्रवक्त्त्याने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news